सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A03s झाला वेबसाईटवर लिस्ट; लवकरच येऊ शकतो भारतात 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 07:30 PM2021-07-29T19:30:30+5:302021-07-29T19:31:48+5:30

Samsung Galaxy A03s India: Samsung Galaxy A03s स्मार्टफोन सपोर्ट पेजवर SM-A037F/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे.

Samsung Galaxy A03s Support Page live in India launch soon  | सॅमसंगचा स्वस्त स्मार्टफोन Samsung Galaxy A03s झाला वेबसाईटवर लिस्ट; लवकरच येऊ शकतो भारतात 

हा प्रतीकात्मक फोटो आहे.

Next

सॅमसंग भारतातील लो बजेट सेग्मेंटमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी आपल्या गॅलेक्सी ए सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. सॅमसंग भारतात आपला नवीन कमी किंमतीतील स्मार्टफोन Samsung Galaxy A03s लाँच करणार आहे, अशी बातमी आता समोर आली आहे. या फोनचे सपोर्ट पेज सॅमसंग इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर लाईव्ह झाले आहेत. Samsung Galaxy A03s स्मार्टफोन सपोर्ट पेजवर SM-A037F/DS मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. यामुळे लवकरच सॅमसंग गॅलेक्सी ए03एस स्मार्टफोन भारतात दाखल होऊ शकतो, अशी चर्चा आहे.  

Samsung Galaxy A03s चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy A03s ची माहिती काही लिक्समधून समोर आली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए03एस स्मार्टफोन वॉटर ड्रॉप नॉच डिजाईनसह सादर केला जाईल. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच या फोनचा आकार 166.6 x 75.9 x 9.1mm असा असेल. फोनच्या तळाला यूएसबी पोर्ट सोबतच 3.5एमएम जॅक असल्याचे देखील लीकमधून समजले आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी ए03एस स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यात 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात येईल. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी Samsung Galaxy A03s मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. 

Web Title: Samsung Galaxy A03s Support Page live in India launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.