Gujarat Election Result 2022 Live: "२०२४च्या निवडणुकीत बघा... भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 01:36 PM2022-12-08T13:36:02+5:302022-12-08T13:37:10+5:30

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

Gujarat Assembly election result 2022 Live Updates Nana Patole says Congress will beat BJP in 2024 | Gujarat Election Result 2022 Live: "२०२४च्या निवडणुकीत बघा... भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही"

Gujarat Election Result 2022 Live: "२०२४च्या निवडणुकीत बघा... भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही"

Next

Congress vs BJP, Nana Patole, Gujarat Election Result 2022 Live: कोरोनाचा विळखा कमी होताच, हळूहळू ठिकठिकाणी निवडणुकांचे पडघम वाजू लागले. दिल्लीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल काल लागले. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला. दुसरीकडे आज बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभेत सलग सातव्यांदा भाजपाने बाजी मारली. हिमाचल प्रदेशात काँग्रेस-भाजपामध्ये काँटे की टक्कर दिसत आहे. पण काँग्रेसमध्ये गुजरात २०१७ ला जी ऊर्जा दिसली होती ती गुजरात २०२२ निवडणुकीत दिसत नसल्याची चर्चा आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सविस्तर उत्तर दिले.

"सध्या देशाच्या संवैधानिक व्यवस्थेलाच धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या महामारीत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. लसीकरणाची भूमिका मांडताना त्यावर मोदींचा फोटो होता. पण आता काही लोक याच लसींच्या साइडइफेक्टसाठी कोर्टात गेलेत. अनेक इतर गोष्टीही चुकीच्या घडत आहेत. या सर्व चुकीच्या गोष्टींविरोधात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. निवडणुका येत असतात, जात असतात. संविधान वाचवणं महत्त्वाचे आहे. कोरोना असतानाही भाजपा निवडणुकांच्या मागे लागले होते. ५ वर्षांनी पुढे पुन्हा निवडणुका येतील. निवडणुका आमच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत"

"हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला काँग्रेसने धक्का दिला आहे. तिथे भाजपाची सत्ता असतानाही आता परिवर्तन घडत आहे. आप पक्ष कोणाची बी टीम आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मला त्यावर काही बोलायची गरज नाही. त्यामुळे काँग्रेसला कोणाचीही डोकेदुखी झालेली नाही. लोकसभेच्या निवडणुकीत गुजरातमधूनच तुम्हाला देशाच्या सत्तेचे परिवर्तन पाहायला मिळेल. लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही बघाल, भाजपाला हेच गुजरात त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही," असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला 

Web Title: Gujarat Assembly election result 2022 Live Updates Nana Patole says Congress will beat BJP in 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.