कुली नं १ मध्ये हा अभिनेता घेणार कादर खान यांची जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 10:52 AM2019-07-02T10:52:08+5:302019-07-02T10:58:34+5:30

कुली नं १ या चित्रपटात कादर खान यांनी करिश्माच्या वडिलांची म्हणजेच होशियार चंदची भूमिका साकारली होती.

'Coolie No 1' remake: Paresh Rawal steps in Kader Khan's shoes for Varun Dhawan and Sara Ali Khan's film | कुली नं १ मध्ये हा अभिनेता घेणार कादर खान यांची जागा

कुली नं १ मध्ये हा अभिनेता घेणार कादर खान यांची जागा

googlenewsNext
ठळक मुद्देकुली नं १ या चित्रपटातील कादर खान यांची भूमिका परेश रावल साकारणार आहेत. या चित्रपटाची कथा कुली नं १ पेक्षा वेगळी असणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

गोविंदा, करिश्मा कपूर आणि कादर खान यांची मुख्य भूमिका असलेला कुली नं १ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाची कथा, या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. विशेष म्हणजे या चित्रपटातील कादर खान आणि गोविंदा यांचे कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना प्रचंड भावले होते. या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटाला अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही.   

अनेक गाजलेल्या चित्रपटांचा रिमेक करण्याचा ट्रेंड सध्या बॉलीवूड मध्ये पाहायला मिळत असून आता नव्वदीत गाजलेल्या कुली नं १ या चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन करणार असून या चित्रपटाची निर्मिती डेव्हिड यांचा मुलगा रोहित करणार आहे. गोविंदाच्या कुली नं १ या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते. कुली नं १ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये गोविंदाच्या भूमिकेत वरुण धवन दिसणार असून करिश्माची भूमिका सारा अली खान साकारणार आहे. 

कुली नं १ या चित्रपटात कादर खान यांनी करिश्माच्या वडिलांची म्हणजेच होशियार चंदची भूमिका साकारली होती. ही भूमिका या चित्रपटातील खूप महत्त्वाची असून कादर यांनी ही खूपच चांगल्या प्रकारे साकारली होती. पण कादर खान यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यांची ही प्रसिद्ध भूमिका आता कुली नं १ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये कोण साकारणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. 

कुली नं १ या चित्रपटातील कादर खान यांची भूमिका परेश रावल साकारणार आहेत. या चित्रपटाची कथा कुली नं १ पेक्षा वेगळी असणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण बँकॉकमध्ये होणार असून या चित्रपटात इतर भूमिकांमध्ये कोणते कलाकार दिसणार याबाबत या चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. 
 

Web Title: 'Coolie No 1' remake: Paresh Rawal steps in Kader Khan's shoes for Varun Dhawan and Sara Ali Khan's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.