कोरोनाचा नवा व्हेरीएंट, कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवरील तपासणी पथके अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 02:44 PM2021-11-29T14:44:31+5:302021-11-29T14:48:34+5:30

ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचे रुग्ण आढळू लागल्याने कर्नाटक शासनाने कर्नाटक- महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवरील तपासणी पथके अलर्ट केली आहेत

RTPCR forced due to infection of new variants | कोरोनाचा नवा व्हेरीएंट, कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवरील तपासणी पथके अलर्ट

कोरोनाचा नवा व्हेरीएंट, कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवरील तपासणी पथके अलर्ट

Next

कोगनोळी : ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटचे रुग्ण आढळू लागल्याने कर्नाटक शासनाने कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य सीमेवरील तपासणी पथके अलर्ट केली आहेत. आरटीपीसीआर निगेटिव प्रमाणपत्राशिवाय कर्नाटक राज्य प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. निगेटीव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहनांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येत आहे.

कर्नाटक राज्य शासनाने नव्याने नियमावली जाहीर करून राज्याच्या सीमेवरील तपासणी पथके शिथीलता झटकून सज्ज केली आहेत. नव्याने रुग्ण सापडू लागल्याने राज्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना महाराष्ट्र कर्नाटक आंतरराज्य सीमेवर कोगनोळी या ठिकाणी असणाऱ्या तपासणी नाक्यावर प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. निगेटीव्ह प्रमाणपत्र नसणाऱ्यांना कर्नाटक राज्य प्रवेशास मज्जाव केल्याने अचानक प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे या तपासणी नाक्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागल्याचे दिसून येत आहे.

पोलीस व प्रवासी यांच्यात शाब्दिक चकमक

कर्नाटक शासनाने रविवारपासून राज्यात प्रवेश करणाऱ्याची कसून तपासणी सुरू केली आहे. आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास त्या प्रवाशांना पुन्हा महाराष्ट्रात पाठविण्यात येत आहे. नेहमी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापूर्वी सवलत देण्यात आली होती. परंतु आता आरटीपीसीआर निगेटिव प्रमाणपत्र नसल्यास राज्यातील प्रवेशास मज्जाव करण्यात आल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवासी व पोलिस यांच्यामध्ये शाब्दिक वाढ होताना दिसत आहेत. तपासणी नाक्यास जिल्हाधिकार्‍यांची भेट कर्नाटक राज्य शासनाने कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमेवरील तपासणी नाके सतर्क केली आहेत. कोगनोळी येथील तपासणी नाक्यावर रविवारी बेळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आर वेंकटेशकुमार यांनी धावती भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला व योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी निपाणी चे तहसीलदार डॉ मोहन भस्मे हे उपस्थित होते.

Web Title: RTPCR forced due to infection of new variants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.