ऋषी कपूर-रणबीर यांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, जैसा बाप, वैसा बेटा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:20 PM2019-08-16T12:20:50+5:302019-08-16T12:21:46+5:30

होय, नीतू कपूर यांनी नुकताच मुलगा रणबीर कपूर आणि पती ऋषी कपूर यांचा एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केलाय. तूर्तास हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय.

neetu kapoor shared video on her instagram check out |  ऋषी कपूर-रणबीर यांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, जैसा बाप, वैसा बेटा!

 ऋषी कपूर-रणबीर यांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, जैसा बाप, वैसा बेटा!

googlenewsNext
ठळक मुद्देऋषी कपूर एकेकाळी सुपरस्टार होते. त्यांची ही जागा आज त्यांच्या मुलाने म्हणजे रणबीरने घेतली आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर जवळजवळ वर्षभरापासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या पत्नी नीतू सिंग या सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. नीतू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. रोज नवे फोटो, व्हिडीओ त्या शेअर करत असतात. सध्या त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा आहे.
होय, नीतू कपूर यांनी नुकताच मुलगा रणबीर कपूर आणि पती ऋषी कपूर यांचा एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ऋषी कपूर - श्रीदेवी तसेच रणबीर कपूर -अनुष्का शर्मा  नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओत रणबीर आपल्या डॅडच्या एका गाण्यावर त्यांच्याच अंदाजात नाचताना दिसतोय. व्हिडीओतील एका स्लाईडमध्ये ऋषी कपूर त्यांची हिरोईन श्रीदेवीसोबत ‘तेरे मेरे होठों पे ...’वर डान्स करत आहेत. तर दुस-या स्लाईडमध्ये याच गाण्यावर रणबीर अनुष्का थिरकताना दिसत आहेत. 


तूर्तास हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. नीतू सिंग यांनी शेअर केल्यापासून हजारो लोकांनी तो पाहिला आहे. साहजिकच हा व्हिडीओ पाहून चाहते क्रेजी झालेत आहेत. ‘जैसा बाप, वैसा बेटा’ अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी यावर दिल्या आहेत.


ऋषी कपूर एकेकाळी सुपरस्टार होते. त्यांची ही जागा आज त्यांच्या मुलाने म्हणजे रणबीरने घेतली आहे. तूर्तास रणबीर ‘शमशेरा’ या चित्रपटात बिझी आहे. यात तो वाणी कपूरसोबत दिसणार आहे. नुकतेच रणबीरने ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे शूटींग पूर्ण केले. या चित्रपटात रणबीर त्याची लेडी लव्ह आलिया भटसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
 
 

Web Title: neetu kapoor shared video on her instagram check out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.