बाळाला दूध पाजण्यासाठी बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला घ्यावा लागला टॉयलेटचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:23 PM2019-10-07T16:23:28+5:302019-10-07T16:23:50+5:30

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीनं टॉयलेटमध्ये बसून बाळाला ब्रेस्टफीड केल्याचा खुलासा केला आहे.

Neha Dhupia breastfeed her daughter mehr in toilet of an airplane | बाळाला दूध पाजण्यासाठी बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला घ्यावा लागला टॉयलेटचा आधार

बाळाला दूध पाजण्यासाठी बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला घ्यावा लागला टॉयलेटचा आधार

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रेटीस सार्वजनिक ठिकाणी ब्रेस्टफीड प्रमोट करत आहेत. यात बॉलिवूडच्या सेलिब्रेटींचाही समावेश आहे. नुकतेच बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिने खुलासा केला आहे की तिने टॉयलेटमध्ये बसून बाळाला दूध पाजलं. 


इंडियन एक्सप्रेसला अभिनेत्री नेहा धुपियानं आई झाल्यानंतर तिच्यासोबत घडलेला एक प्रसंगाबद्दल मुलाखतीत सांगितले.ती म्हणाली की, 'मी विमानाच्या टॉयलेटमध्ये, झाडाच्या मागे, कारमध्ये इतकंच नाही तर क्लोजअपसाठी कॅमेरासमोर सुद्धा माझी मुलगी माहिराला ब्रेस्टफीड केलं आहे. पण मला वाटतं आम्हाला आमच्या बाळाला ब्रेस्टफीड करण्यासाठी चांगली जागा मिळायला हवी. मी माझ्या बाळाला टॉयलेटमध्ये का अन्न द्यावं.'


नेहा पुढे म्हणाली, 'ब्रेस्टफीड अर्थात आईचं दूध हे बाळाच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. मात्र यावरुन लोकांनी कोणाबद्दल आपली मतं तयार करू नयेत. कारण प्रत्येक महिला म्हणजे प्रत्येक आईसाठी परिस्थिती वेगवेगळी असू शकते.'


 नेहा धुपियानं काही दिवसांपूर्वीच #freedomtofeed मोहिमेला सुरुवात केली आहे. यातून ती पहिल्यांदा आई होणाऱ्या महिलांना बाळाच्या खाणं-पिणं देण्याचे अचूक पद्धतींबद्दल जनजागृती करते आहे. तिच्या या मोहिमेला खूप चांगला प्रतिसादही मिळतो आहे.


मागील वर्षी डिसेंबर २०१८मध्ये नेहा धुपिया हिने मुलीला जन्म दिला आहे. काही दिवसातच नेहाची मुलगी मेहर १ वर्षाची होईल.

नेहा नेहमी मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र आतापर्यंत तिने कधी तिच्या मुलीचा चेहरा दाखवला नाही. कदाचित ती मेहरच्या पहिल्या वाढदिवसादिवशी तिचा क्युट चेहरा सर्वांना दाखवेल.

Web Title: Neha Dhupia breastfeed her daughter mehr in toilet of an airplane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.