गायत्री सोहम दिसणार या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 04:07 PM2019-11-06T16:07:23+5:302019-11-06T16:20:21+5:30

या चित्रपटात मिलिंद शिंदे, गायत्री सोहम, अन्वेषा म्हसकर, मयूर भाटकर, संदेश गायकवाड, संदीप रसाळ, स्मिता प्रभू, तन्वी नडे, ईश्वरी थोरात, अदिती सावंत आदींच्या भूमिका आहेत. ‘

Gayatri soham will seen in marathi movie ranu | गायत्री सोहम दिसणार या सिनेमात

गायत्री सोहम दिसणार या सिनेमात

googlenewsNext

आपल्याकडे खेळ व खेळाडू यांच्यावर काही चित्रपट जरूर बनले आहेत परंतु त्यांची संख्या नगण्य आहे. काही समाजभान जपणारी मंडळी खेळाला महत्व देणारे चित्रपट काढण्यासाठी उत्सुक आहेत. निर्मात्या स्वप्ना कदम व लेखक, दिग्दर्शक कय्युम काझी यांनी एकत्र येऊन एक मराठी चित्रपट बनविला आहे जो आपल्याकडील खेळांबाबत औदासिन्यतेकडे अंगुली निर्देश करतो. चित्रपटाचे नाव ‘रानु’ असून तो एका मुलीच्या धावण्याचा उत्कट आसक्तीबद्दल भाष्य करतो. रानु लहानपणापासूनच धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेत असते परंतु तिला नेहमी दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागत असते. ती प्रथम क्रमांक पटकावण्याचा ध्यास घेते व या प्रयत्नांत तिला कोणकोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो हे थराराकरित्या चित्रपटातून मांडले आहे. 
 ‘रानु’ हा चित्रपट शिक्षण व खेळ यामधील पालकांच्या मनोवैज्ञानिक विचारांवर बोट ठेवतो व त्याचबरोबर खेळातील राजकारणावरदेखील दाहक भाष्य करतो. चित्रपटाचा विषय गंभीर वाटत असला तरी दिग्दर्शकाने मनोरंजनात कमतरता ठेवली नाहीये.

‘रानु’ ची निर्मिती स्व एंटरटेनमेंट्सच्या बॅनरखाली झाली असून स्वप्ना कदम यांनी निर्मितिसूत्रे सांभाळली आहेत. कय्युम काझी यांनी कथा, पटकथा, संवाद लिहिले असून दिग्दर्शनची भूमिकाही बजावली आहे. छायाचित्रण विनोद शर्मा यांचे असून अनिल थोरात संकलक आहेत.

गीतकार सुबोध पवार यांच्या गीतांवर स्वरसाज चढवलाय संगीतकार विनोद विल्सन यांनी. या चित्रपटात मिलिंद शिंदे, गायत्री सोहम, अन्वेषा म्हसकर, मयूर भाटकर, संदेश गायकवाड, संदीप रसाळ, स्मिता प्रभू, तन्वी नडे, ईश्वरी थोरात, अदिती सावंत आदींच्या भूमिका आहेत. ‘रानु’ चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला पीकल एंटरटेनमेंट्स संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करत आहे.

Web Title: Gayatri soham will seen in marathi movie ranu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.