Birthday Special : या अभिनेत्रीला कधीकाळी मिळाला होता ‘बॅड लक हिरोईन’चा टॅग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 08:00 AM2019-08-01T08:00:00+5:302019-08-01T08:00:02+5:30

कधी काळी हिला इंडस्ट्रीतले लोक हिला ‘बॅड लक हिरोईन’ म्हणायचे. पण आज ती बॉलिवूडची टॉप लीड अ‍ॅक्ट्रेस आहे.

taapsee pannu birthday special, some unknown facts | Birthday Special : या अभिनेत्रीला कधीकाळी मिळाला होता ‘बॅड लक हिरोईन’चा टॅग!

Birthday Special : या अभिनेत्रीला कधीकाळी मिळाला होता ‘बॅड लक हिरोईन’चा टॅग!

googlenewsNext
ठळक मुद्देतापसी सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तिने सहा महिने नोकरी केली. त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली.

कधी काळी हिला इंडस्ट्रीतले लोक हिला ‘बॅड लक हिरोईन’ म्हणायचे. पण आज ती बॉलिवूडची टॉप लीड अ‍ॅक्ट्रेस आहे. अपार कष्ट, जिद्द, चिकाटी या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये असे काही यश मिळवले की ‘बॅड लक हिरोईन’ म्हणणा-यांची तोंड बंद झालीत. आम्ही बोलतोय ते अभिनेत्री तापसी पन्नू हिच्याबद्दल. आज तापसीचा वाढदिवस. 1 ऑगस्ट 1987 रोजी दिल्लीमध्ये तापसीचा जन्म झाला. 

 पंजाबी घरात जन्मास आलेल्या तापसीने 2010 मध्ये ‘झुम्माण्डि नादां’ या तेलगू चित्रपटातून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली. पण करिअरच्या सुरुवातीला तिला बºयाच वाईट अनुभवातून जावे लागले. एक वेळ अशी आली की लोक तिला ‘बॅड लक हिरोईन’ म्हणू लागले.


 
होय, एका मुलाखतीत तापसी याबद्दल बोलली होती. तिने सांगितले होते की, कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करुन मी पॉकेट मनी कमवत होते. कॅट परिक्षेत 88% मिळवल्यानंतर एमबीए करण्याच्या विचारात असताना मला अचानक सिनेमाची ऑफर आली. मी ही ऑफर स्वीकारली. पण माझा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतरचे सलग दोन सिनेमेही आपटले. यानंतर सर्वच मला ‘बॅड लक हिरोईन’ समजू लागले.

मला सिनेमात घेतले की चित्रपट फ्लॉप होईल, या भीतीने अनेकांनी मला काम देण्यास नकार दिला. या टॅगमुळे कुठलाही अभिनेता, दिग्दर्शक-निर्माता माझ्यासोबत काम करण्यास तयार नव्हता. एका निर्मात्याने तर एका सिनेमासाठी माझे नाव फायनल केले, शूटिंगच्या तारखाही ठरवल्या. पण ऐनवेळी मला काढून एका मोठ्या हिरोईनला कास्ट केले. माझे सुरुवातीचे सगळे सिनेमे मोठ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले होते. त्यात मोठमोठे अभिनेते होते. पण सिनेमा फ्लॉप झाल्यावर केवळ मला ‘बॅड लक’चा टॅग लावला गेला.

  वयाच्या आठव्या वर्षांपासून तापसीने कथ्थक आणि भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.


 
तापसी सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तिने सहा महिने नोकरी केली. त्यानंतर ती मॉडेलिंगकडे वळली. मॉडेलिंग करत असताना तिला तेलुगू चित्रपटसृष्टीतून चित्रपटाच्या ऑफर येण्यास सुरुवात झाली.

Web Title: taapsee pannu birthday special, some unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.