बीचवाले कुटुंबाला मिळाला दुबईतून लग्नाचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 07:15 AM2019-01-09T07:15:00+5:302019-01-09T07:15:00+5:30

मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाच्या संघर्षाला अधोरेखित करणाऱ्या सोनी सबच्या हलक्याफुलक्या 'बीचवाले' या मालिकेने प्रेक्षकांवर प्रभाव टाकला आहे.

Beachwaale family got a marriage proposal from Dubai | बीचवाले कुटुंबाला मिळाला दुबईतून लग्नाचा प्रस्ताव

बीचवाले कुटुंबाला मिळाला दुबईतून लग्नाचा प्रस्ताव

googlenewsNext
ठळक मुद्दे'बीचवाले' मालिकेला मिळतोय चांगला प्रतिसादबीचवाले कुटुंबाला दुबईतून लग्नाचा आला प्रस्ताव

मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबाच्या संघर्षाला अधोरेखित करणाऱ्या सोनी सबच्या हलक्याफुलक्या 'बीचवाले' या मालिकेने प्रेक्षकांवर प्रभाव टाकला आहे. आगामी ट्रॅकमध्ये बीचवाले कुटुंबाला दुबईतून लग्नाचा प्रस्ताव आला असून ते अडचणीत आलेले दिसतात.

दुबईतून आलेली एनआरआय मुलगी राजूचे प्रोफाइल लग्नाच्या साइटवर वाहून त्याच्याकडे खूप आकर्षित होते. परंतु, तिचे एकमेव उद्दिष्ट असा एक मुलगा मिळवण्याचे असते, ज्याला ती दुबईला घेऊन जाऊ शकेल आणि स्वतःचा नोकर म्हणून ठेवू शकेल. मुलीचा खरा हेतू माहीत नसलेले बीचवाले कुटुंबीय परदेशात जाण्याच्या संधीचा विचार करून उत्साहित होतात. ही मुलगी प्रचंड श्रीमंत असल्याचे लक्षात आल्यावर बॉबीला (झाकीर हुसेन) काहीतरी शंका येते आणि तो पप्पीला (मनोज गोयल) दुबईला सत्य जाणून घेण्यासाठी पाठवतो. मुलीच्या गुंडांकडून पप्‍पीचे अपहरण केले जाते आणि त्याला लग्नाला होकार द्यावा लागतो तेव्हा गोष्टीला वेगळे वळण मिळते. पप्‍पी राजूला या घोटाळ्यापासून वाचवू शकेल का? हे पाहण्यासाठी मालिका नक्कीच पहा.
पप्‍पीच्या भूमिकेतील मनोज गोयल म्हणाला की, 'बीचवाले कुटुंबाचा भाग होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, कारण यातील सर्व कलाकार अत्यंत प्रतिभावान आहेत आणि त्यांच्यासोबत चित्रिकरण करताना खूप मजा येते. हा शो अत्यंत सुसंगत विषय घेतो आणि विनोदी पद्धतीने मांडतो. आगामी ट्रॅकमध्ये पप्‍पीवर या खोटारड्या एनआरआय मुलीपासून राजूला वाचवण्याची जबाबदारी येते.'
राजूच्या भूमिकेतील राजीव पांडे म्हणाला की, 'बीचवालेच्या टीमसोबत काम करताना खूप मजा येते. या शोची संकल्पना मजेशीर आहे आणि प्रेक्षक या मालिकेशी सहजतेने जुडले जातात. आगामी एपिसोड्समध्ये राजू दुबईतून आलेल्या लग्नाच्या प्रस्तावामुळे अडचणीत सापडतो. प्रेक्षकांना या नवीन ट्विस्टमुळे मजा येईल, असे मला वाटते.'

Web Title: Beachwaale family got a marriage proposal from Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.