अकोला पोलीस पथकावर आरोपीने केला गोळीबार; अमरावतीच्या लक्ष्मीनगरात घडला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2022 01:25 PM2022-08-15T13:25:49+5:302022-08-15T13:26:57+5:30

आरोपी रावत याने पोलिसांवर थेट फायर केला. त्याने पोलिसांच्या दिशेने तीन फायर केले.

Accused opened fire on Akola police team; The incident happened in Lakshminagar of Amravati | अकोला पोलीस पथकावर आरोपीने केला गोळीबार; अमरावतीच्या लक्ष्मीनगरात घडला प्रकार

अकोला पोलीस पथकावर आरोपीने केला गोळीबार; अमरावतीच्या लक्ष्मीनगरात घडला प्रकार

googlenewsNext

अमरावती : स्थानिक लक्ष्मीनगर परिसरात सोमवारी सकाळी एका आरोपीने अकोला पोलीस पथकावर गोळीबार केला. मात्र तो हल्ला परतवून लावत पळण्याच्या बेतात असलेल्या त्या आरोपीला अटक करण्यात अकोलापोलिसांना यश आले. अकोला येथील राजेश रावत नामक आरोपी अमरावतीतील लक्ष्मीनगरात दडला असल्याच्या माहितीवरून अकोला शहर पोलीस पथक सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास तेथे पोहोचले.

आरोपी रावत याने पोलिसांवर थेट फायर केला. त्याने पोलिसांच्या दिशेने तीन फायर केले. मात्र पोलीस त्यातून बचावले. आरोपीने गोळी बारानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. भरधाव वेगाने पळून जात असताना त्याची कार एका खांबाला धडकली. अकोला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून गाडगेनगर पोलिसांनी राजेश रावतविरुद्ध कलम 307 व आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. दोन दिवसांपूर्वी अमरावतीमधील बाबा चौकात झालेल्या गोळीबारात एक 13 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली  होती. दरम्यान सोमवारी संपूर्ण पोलीस मुख्यालयी असताना गोळीबार झाल्याने गाडगेनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले..

Web Title: Accused opened fire on Akola police team; The incident happened in Lakshminagar of Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.