नांदगाव शिवसैनिक उतरले नदी स्वच्छ करायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 10:49 PM2021-09-27T22:49:41+5:302021-09-27T22:50:24+5:30

नांदगाव : लेंडी नदीपात्रातील गाळ उपसा करून नदीपात्राच्या खोलीकरणाच्या कामासाठी शिवसैनिकांनी सोमवारी पुढाकार घेतला आणि भर पावसात नदी व परिसर स्वच्छ केला.

Nandgaon Shiv Sainik descended to clean the river | नांदगाव शिवसैनिक उतरले नदी स्वच्छ करायला

नांदगाव येथील लेंडी नदीपात्रातील गाळ काढताना शिवसैनिक.

googlenewsNext
ठळक मुद्देभर पावसात नदी व परिसर स्वच्छ केला.

नांदगाव : लेंडी नदीपात्रातील गाळ उपसा करून नदीपात्राच्या खोलीकरणाच्या कामासाठी शिवसैनिकांनी सोमवारी पुढाकार घेतला आणि भर पावसात नदी व परिसर स्वच्छ केला.
एकीकडे पावसाची सलग संततधार तर दुसरीकडे पूरपाण्याच्या पातळीत अधूनमधून कमी-अधिक होणारी वाढ व घट असा पाठशिवणीचा खेळ सुरू असताना वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी आमदार सुहास कांदे यांच्या सांगण्यावरून शहरातील शिवसैनिक मैदानात उतरले. पाऊस थांबत नसला तरी किमान स्वच्छता तातडीने व्हाव्यात यासाठी आमदार कांदे यांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, शहर प्रमुख सुनील जाधव, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे, शहरप्रमुख मुज्जू शेख मोईन शेख, भाऊराव बागुल, आरिफ शेख, सद्दाम शेख, जहीर सौदागर आदींसह शिवसेना युवासेनेचे कार्यकर्त्यांनी दिवसभरात मोहीम राबविली.

जेसीबीच्या साहाय्याने भाजी बाजाराशेजारील पुलाखालील गाळ स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले, आणि अंडरपासचे पाणी जाण्यासाठी जागा करण्यात आली. तात्पुरत्या स्वरूपात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दि. २७) सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत काम सुरू होते.
पुलाच्या ३ मोऱ्या बंद होत्या त्या उघडल्या पण साचलेल्या पाण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. कदाचित रात्रीतून ते वाहून जाईल आणि पुलाखालील मार्ग मोकळा होऊ शकतो, उद्या मंगळवारी पुन्हा मोहीम सुरू राहील अशी माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

Web Title: Nandgaon Shiv Sainik descended to clean the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.