Next

रत्नागिरीत एक बाटली व चार खिळ्यांच्या माध्यमातून शेतकरी डुकरांना लावतायत पळवून 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2017 05:50 PM2017-10-02T17:50:14+5:302017-10-02T17:50:37+5:30

रत्नागिरी - एक बाटली आणि चार खिळे... हो! केवळ एक बाटली आणि चार खिळे घेऊन साखरपा (ता. संगमेश्वर) येथील ...

रत्नागिरी - एक बाटली आणि चार खिळे... हो! केवळ एक बाटली आणि चार खिळे घेऊन साखरपा (ता. संगमेश्वर) येथील शेतकरी डुकरांना पळवून लावतात. शेतीला पाखरांप्रमाणेच डुकरांचा त्रासही खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यावर पर्याय म्हणून साखरपा येथील शेतकऱ्यांनी एका नामी शक्कल लढवली आहे. एका बांबूला एक बाटली बाःधून त्याच्या चारही बाजूंना खिळे बांधून ठेवण्यात आले आहेत. वारा आला की खिळे बाटलीवर आपटतात आणि आवाज होत राहतो. या आवाजामुळे डुकरे शेतात येत नाहीत. त्याच बांबूला एक फडकाही बांधून ठेवण्यात आला आहे. वारा आला की फडका हलतो. त्यामुळे पाखरेही येत नाहीत.