रेल्वेमंत्र्यांना हमालांनी पाठविली प्रत्येकी १ रुपयाची मनीआॅर्डर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 07:35 PM2018-08-13T19:35:41+5:302018-08-13T19:36:25+5:30

रेल्वे सेवेत समाविष्ट करण्यासाठी देशभरातील हमालांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना प्रत्येकी एक रुपयाप्रमाणे मनीआॅर्डर करून अनोखे आंदोलन करण्यात येत आहे़

Money orders of Rs. 1 each sent to the rail minister | रेल्वेमंत्र्यांना हमालांनी पाठविली प्रत्येकी १ रुपयाची मनीआॅर्डर

रेल्वेमंत्र्यांना हमालांनी पाठविली प्रत्येकी १ रुपयाची मनीआॅर्डर

googlenewsNext

औरंगाबाद : रेल्वे सेवेत समाविष्ट करण्यासाठी देशभरातील हमालांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना प्रत्येकी एक रुपयाप्रमाणे मनीआॅर्डर करून अनोखे आंदोलन करण्यात येत आहे़  या आंदोलनात औरंगाबाद स्थानकातील हमालांनीही यात सहभागी होत शनिवारी प्रत्येकी एक रुपयाप्रमाणे १२ रुपयांचे मनीआॅर्डर केले़ 
अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे रेल्वेस्थानकावरील हमाल बांधवांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांना ग्रुप डी मध्ये (चतुर्थ श्रेणी कर्मचारी) समाविष्ट करावे अशी हमालांची मागणी आहे़  २००८ मध्ये ज्या पद्धतीने रेल्वे हमाल यांना गँगमन व ट्रकमन सेवेत समाविष्ट करण्यात आले होते़  त्याच पद्धतीने समाविष्ट होण्यासाठी आठ वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे़  वारंवार निवेदने, आंदोलने, कामबंद करूनही शासनाने दुर्लक्ष केले़  आता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी    हमालांनी शनिवारी १२ कुलींनी प्रत्येक एक रुपयाप्रमाणे मनीआॅर्डर करून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. 

या अनोख्या आंदोलनात शेख रफिक, युसूफ शहा, संतोष भाले, गणेश पोळके, मीराबाई मेवाळ, पंकज जाधव, महेंद्र वाव्हळे, सचिन कंगाळे, विनायक भिसे, डेव्हिड दास आदींनी सहभाग नोंदविला़ दरम्यान, १६ आॅगस्टला शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहेत़  देशभरामध्ये हमालांची संख्या २५ हजारांवरहमाल काम करीत आले आहे. 
 

Web Title: Money orders of Rs. 1 each sent to the rail minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.