सजल अली बॉयफ्रेंडसोबत अडकली लग्नबेडीत, श्रीदेवीच्या मुलीच्या भूमिकेतून केली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 02:42 PM2020-03-16T14:42:12+5:302020-03-16T14:43:53+5:30

Pakistani Actress Sajal Ali

पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली तिचा बॉयफ्रेंड अहद रजा मीरसोबत आबुधाबीमध्ये विवाहबंधनात अडकली आहे.

हजा रजा मीरसोबत लग्न केल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीने इंस्टाग्रामवर स्वतःचं नाव बदलून पतीचं नाव ठेवलं आहे.

सजलने सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर करून लग्नाची माहिती दिली आहे.

सजल अलीने इंस्टाग्रामवर नाव बदलताच तिचे पाच लाख फॉलोव्हर्स वाढले आहेत.

सजलने मॉम चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या सावत्र मुलीची भूमिका केली होती.

मॉम चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतूक झालं होतं.

तिच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.