तरुणीला दारु पाजून बाथरूममध्ये नेऊन केला बलात्कार; मोबाईलमधील ऑडिओ क्लिपच्या मदतीने आरोपीला झाली सजा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 09:35 PM2021-07-30T21:35:00+5:302021-07-30T21:36:34+5:30

Rape Case : न्यायालयाने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या दानिशला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

Girl raped after getting drunk accused caught by phone recording in uk police investigation | तरुणीला दारु पाजून बाथरूममध्ये नेऊन केला बलात्कार; मोबाईलमधील ऑडिओ क्लिपच्या मदतीने आरोपीला झाली सजा

तरुणीला दारु पाजून बाथरूममध्ये नेऊन केला बलात्कार; मोबाईलमधील ऑडिओ क्लिपच्या मदतीने आरोपीला झाली सजा

googlenewsNext
ठळक मुद्देद सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव डॅनिश आहे. त्याचे वय 38 वर्षे आहे.

लंडनः उत्तर हॅम्प्टन, युनायटेड किंगडम (यूके) येथून बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. आरोपीने प्रथम १८ वर्षीय मुलीला दारू पाजून नंतर तिला बाथरुममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. 

मुलीच्या मोबाइलचे ऑडिओ रेकॉर्डिंग चालू होते
द सनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपीचे नाव डॅनिश आहे. त्याचे वय 38 वर्षे आहे. पोलिसांच्या तपासणीत आरोपीविरोधात भक्कम पुरावे सापडले आहेत. खरं तर, घटनेदरम्यान, पीडितेच्या मोबाईलचे ऑडिओ रेकॉर्डिंग चालू होते, ज्यामध्ये पीडित आणि आरोपीचा आवाज रेकॉर्ड केला गेला होता.


आरोपीने पीडितेवर हे आरोप केले
न्यायालयात सुनावणी दरम्यान आरोपीने सांगितले की, त्याने मुलीवर जबरदस्ती केली नाही. ती त्याच्याशी संबंध ठेवण्यास तयार होती. तेथून निघून गेल्यावर तिने माझ्यावर खोटे आरोप केले.

अशा प्रकारे आरोपीचा गुन्हा झाला सिद्ध
कोर्टाने डॅनिशला दोषी मानले आणि पीडित मुलीशी जबरदस्तीने संबंध ठेवल्याचे सांगितले. फोनचे ऑडिओ रेकॉर्डिंग हा त्याच्याविरुद्ध सर्वात मोठा पुरावा आहे. पीडितेचा वेदनादायक आवाज रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतो. ती त्याला वारंवार सांगते की, तिला सोडून दे आणि घरी जाऊ दे. पण आरोपींनी त्याला जाऊ दिले नाही आणि अत्याचार सुरूच ठेवले.


न्यायालयाने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या दानिशला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश क्रेन म्हणाले की, डॅनिशसारखे लोक तरुणींचा  गैरफायदा फायदा घेतात. डॅनिशनेही मुलीच्या इच्छेने संबंध ठेवल्याचे सांगून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Girl raped after getting drunk accused caught by phone recording in uk police investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.