सव्वालाखाच्या लाचप्रकरणी गंगापूर तहसीलदारावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:05 AM2021-04-10T04:05:21+5:302021-04-10T04:05:21+5:30

गंगापूर : आपेगाव (ता. गंगापूर) येथील वडिलोपार्जित असलेल्या जमिनीमधील सातबाऱ्यावर असलेला कूळ कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी ...

Crime against Gangapur tehsildar in bribery case | सव्वालाखाच्या लाचप्रकरणी गंगापूर तहसीलदारावर गुन्हा

सव्वालाखाच्या लाचप्रकरणी गंगापूर तहसीलदारावर गुन्हा

googlenewsNext

गंगापूर : आपेगाव (ता. गंगापूर) येथील वडिलोपार्जित असलेल्या जमिनीमधील सातबाऱ्यावर असलेला कूळ कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर असल्याचा शेरा कमी करण्यासाठी सव्वालाखाची लाच मागणारे गंगापूरचे तहसीलदार अविनाश महादेव शिंगोटे, महसूल सहायक अशोक बाबूराव मरकड यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराची गंगापूर तालुक्यातील आपेगाव येथे गट क्रमांक १९ मध्ये वडिलोपार्जित जमीन आहे. त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर कूळ कायद्याप्रमाणे व्यवहार बेकायदेशीर असलेला शेरा कमी करण्यासाठी तहसीलदारांनी साडेचार लाख रुपयांची मागणी केली होती. रक्कम जास्त होत असल्याचे फिर्यादीने सांगितल्यावर महसूल सहायक मरकड यांनी रक्कम कमी- जास्त करू, असे सांगितले. त्यानंतर सव्वालाख रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी ४ वाजेदरम्यान तहसील कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे ७० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना सहायक अशोक मरकड यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मारुती पंडित, पो.नि. विलास घनवट, अप्पर पोलीस अधीक्षक ब्रह्मदेव गावडे, पोना. प्रकाश घुगरे, पोना. भूषण देसाई, मिलिंद इप्पर यांनी केली.

दुसऱ्या कारवाईत तहसीदारांनी काढला पळ

वाळू वाहतूकदाराच्या दुसऱ्या फिर्यादीवरून रॉयल्टी भरलेला वाळूचा हायवा सोडवण्यासाठी तहसीलदार शिंगोटे यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती. तो सापळादेखील शुक्रवारी रचण्यात आला होता; पण शिंगोटे यांना कुणकुण लागताच त्यांनी पळ काढला.

(तहसीलदार शिंगोटे यांचे छायाचित्र.)

Web Title: Crime against Gangapur tehsildar in bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.