‘अक्षरा बहू’चा हॉट अवतार, ‘नो मेकअप’ लूक पाहून व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 11:49 AM2019-12-30T11:49:36+5:302019-12-30T11:51:14+5:30

टीव्ही अभिनेत्री हिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहू’ म्हणून अधिक ओळखतात.

tv actoress hina khan new hot pics will viral | ‘अक्षरा बहू’चा हॉट अवतार, ‘नो मेकअप’ लूक पाहून व्हाल खल्लास

‘अक्षरा बहू’चा हॉट अवतार, ‘नो मेकअप’ लूक पाहून व्हाल खल्लास

googlenewsNext
ठळक मुद्देहोय,   हिना बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच विक्रम भटच्या सिनेमात झळकणार आहे.

टीव्ही अभिनेत्री हिना खानला आजही तिचे चाहते हिना म्हणून कमी आणि ‘अक्षरा बहू’ म्हणून अधिक ओळखतात. आपली ही ओळख पुसण्यासाठी हिनाने जीवाचा बराच आटापीटा केला. साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या निर्णयामुळेच तिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मालिका सोडत आव्हानात्मक कामे स्विकारली.  बिग बॉस 11  आणि  खतरों के खिलाडी सिझन 8 या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली. हिना खान  लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. आता तर ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, काही तासांपूर्वी हिनाने स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. 

सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. येथील काही फोटो हिनाने सोशल मीडियावर  अपलोड केले आहेत.

या फोटोंमध्ये हिनाचा बोल्ड आणि हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
हिनाच्या बोल्ड अदांपुढे चाहते पुरते घायाळ झाले आहेत. हे फोटोशूट बीचवर केल्याचे दिसत आहे. यामध्ये हिनाच्या पाठीवर रेती लागल्याचे  दिसत आहे.

 हिनाच्या या फोटोंना जवळपास 5 लाखांहून अधिक लाईक्स 2 हजार कमेंट्स आल्या आहेत.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही मालिकांतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खानची कान फिल्म फेस्टिवलमध्ये जाणारी पहिली टीव्ही अभिनेत्री ओळख आहे.

‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये हिना कोमोलिकाची भूमिका साकारताना दिसली होती. हिना कोमोलिका बनून पडद्यावर आली आणि पहिल्याच एपिसोडमध्ये तिने स्वत:ची छाप सोडली.

जुन्या कोमोलिकाला विसरून प्रेक्षक नव्या कोमोलिकाच्या प्रेमात पडले. पण काहीच महिन्यानंतर हिना ‘कसौटी जिंदगी के 2’ सोडणार अशी बातमी आली आणि प्रेक्षकांची निराशा झाली. ही बातमी खरी ठरली आणि हिना ‘कसौटी जिंदगी के 2;मधून गायब झाली.  कशासाठी तर चित्रपटासाठी.

होय,   हिना बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच विक्रम भटच्या सिनेमात झळकणार आहे.  यात ती एक फॅशन डिझायनरची भूमिका साकारणार आहे.  

  

Web Title: tv actoress hina khan new hot pics will viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.