भारतीय जवानांनी रक्तदान करून जीव वाचवलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 11:06 AM2022-09-04T11:06:33+5:302022-09-04T11:08:09+5:30

आपले रक्त सांडण्यासाठी आलेल्याला रक्त देऊन भारतीय लष्कराने मानवतेचे आगळेवेगळे उदाहरण जगासमोर ठेवले. मात्र आता त्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे.

Terrorist Tabarak Hussain died by heart attack in army hospital | भारतीय जवानांनी रक्तदान करून जीव वाचवलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

भारतीय जवानांनी रक्तदान करून जीव वाचवलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Next

जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीच्या प्रयत्नात काही दिवसांपूर्वी जखमी झालेल्या पाकिस्तानीदहशतवाद्याला रक्त देऊन भारतीय जवानांनी त्याचे प्राण वाचवले होते. आपले रक्त सांडण्यासाठी आलेल्याला रक्त देऊन भारतीय लष्कराने मानवतेचे आगळेवेगळे उदाहरण जगासमोर ठेवले. मात्र आता त्या पाकिस्तानीदहशतवाद्याचा मृत्यू झाला आहे. हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तबारक हुसैन असं या दहशतवाद्याचं नाव असून चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला होता. 

हुसैन पाकव्याप्त काश्मीरातील सब्जकोट गावचा रहिवासी असल्याचे सांगितले. पाकिस्तानचे कर्नल युनूस चौधरी यांनी त्याला भारतीय चौक्यांवर हल्ला करण्यासाठी 30 हजार पाकिस्तानी रुपये दिले होते, असे तो म्हणाला होता. तसेच मला बाकीच्या दहशतवाद्यांनी धोका दिला. त्यामुळे मी पकडला गेलो. माझे सहा महिन्यांचे प्रशिक्षण झाले असून, पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा व जैश ए मोहंमद या दहशतवादी संघटनांच्या अनेक शिबिरांत मी गेलेलो असंही सांगितलं होतं. 

गोळी लागून हा दहशतवादी झाला होता जखमी 

21 ऑगस्ट रोजी नौशेराच्या झांगर सेक्टरमध्ये भारतीय जवानांना तीन दहशतवादी दिसले. त्यांतील एकजण नियंत्रण रेषेलगतच्या भारतीय चौकीजवळ येऊन संरक्षक तार तोडण्याचा प्रयत्न करीत होता. जवानांनी आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गोळीबारानंतर एकाला जिवंत पकडण्यात आले; तर अन्य दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. गोळी लागून हा दहशतवादी जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी राजौरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती लेफ्टनंट कर्नल देवेंद्र यादव यांनी दिली होती. 

हाताने जेवणही भरवले...

हुसैनचा खूप रक्तस्राव झाला होता. तो जीवन-मरणाच्या सीमेवर होता. भारतीय जवानांनी रक्त देऊन त्याचे प्राण वाचवले. एवढेच नाहीतर त्याला आपल्या हाताने जेवण भरवले, असे ब्रिगेडियर राणा म्हणाले होते. मी मरण्यासाठी आलो होतो, मला धोका देण्यात आला. बंधू, मला येथून बाहेर काढा, असे हुसैन अटकेवेळी ओरडत होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. 
 

Web Title: Terrorist Tabarak Hussain died by heart attack in army hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.