Video : चार मानवी थर लावून मनसेने दिल्या घोषणा; मनसैनिकांना अटक आणि सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 07:40 PM2021-08-31T19:40:27+5:302021-08-31T19:50:06+5:30

MNS Dahihandi : पदाधिकाऱ्यांना वर्तकनगर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जामिनावर त्यांची सुटका झाली आहे. 

Video: It was expensive to celebrate Dahihandi; MNVS office bearers arrested | Video : चार मानवी थर लावून मनसेने दिल्या घोषणा; मनसैनिकांना अटक आणि सुटका

Video : चार मानवी थर लावून मनसेने दिल्या घोषणा; मनसैनिकांना अटक आणि सुटका

Next
ठळक मुद्देहिंदू सणांवर कितीही निर्बंध आणली तरी मनसे ते साजरे करणारच, नियमावली द्या आम्ही त्याचा अवलंब करू अशी प्रतिक्रिया मनविसेचे जिल्हाध्यक्ष  संदीप पाचंगे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

ठाणे : राज्य शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चार थर लावून दहीहंडी फोडली. याप्रकरणी मनविसे ओवळा माजिवडा विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांना वर्तकनगर पोलिसांकडून मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली आणि त्यांनतर जामिनावर सुटका करण्यात आली. राज्य शासनाने दहीहंडी साजरी करण्याचे आवाहन करून देखील उत्सवावरील निर्बंध झुगारून मनविसेच्या पदाधिकाऱ्यांनीही दहीहंडी साजरी केली. वर्तक नगर येथे पदाधिकाऱ्यांनी चार थर लावून मनसेचा झेंडा फडकविण्यात आला. सोमवारी मध्यरात्री १२.२० वा. थर लावून दहीहंडी फोडली. यावेळी विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. मंगळवारी दुपारी वर्तकनगर पोलिसांनी विद्यार्थी सेनेच्या संदीप चव्हाण, मयूर तळेकर, मंदार पाष्टे, सागर वर्तक यांना अटक केली आणि तात्काळ जामिनावर सुटका केली.

हिंदु सणांवर कितीही निर्बंध आणली तरी मनसे ते साजरे करणारच, नियमावली द्या आम्ही त्याचा अवलंब करू अशी प्रतिक्रिया मनविसेचे जिल्हाध्यक्ष  संदीप पाचंगे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

 

Web Title: Video: It was expensive to celebrate Dahihandi; MNVS office bearers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.