संतमंत अनुयायी आश्रममध्ये आता 'टोकन सिस्टम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:07 AM2021-07-27T04:07:15+5:302021-07-27T04:07:15+5:30

मुंबई : कांदिवली पूर्व येथील संतमंत अनुयायी आश्रम लसीकरण सेंटर येथे ‘व्हॉट्सॲप’वर लसीचे टोकन बुकिंग करण्याचा प्रकार 'लोकमत' ने ...

'Token system' now in Santmant Anuvai Ashram | संतमंत अनुयायी आश्रममध्ये आता 'टोकन सिस्टम'

संतमंत अनुयायी आश्रममध्ये आता 'टोकन सिस्टम'

Next

मुंबई : कांदिवली पूर्व येथील संतमंत अनुयायी आश्रम लसीकरण सेंटर येथे ‘व्हॉट्सॲप’वर लसीचे टोकन बुकिंग करण्याचा प्रकार 'लोकमत' ने उघड केला होता. त्यानुसार शुक्रवारी याठिकाणी परिमंडल सातच्या पालिका उपायुक्त, आर. दक्षिणच्या सहाय्यक आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांनी सरप्राईज व्हिजिट दिली. त्यानंतर याठिकाणी कडक नियम लागू करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सदर लसीकरण केंद्रावर सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचे वृत्त ‘लोकमत’ने २० जुलै, २०२१च्या अंकात धक्कादायक! 'ऑफलाईन लसीकरणाच्या 'टोकन'चे व्हॉट्सॲपवरच होते बुकिंग! या मथळ्याखाली प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत शुक्रवारी दुपारी परिमंडल सातच्या पालिका उपायुक्त डॉ. भाग्येश्री कापसे, आर. दक्षिण वार्डच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, आरोग्य विभागाच्या डॉ. नाजनीन खान तसेच अन्य अधिकाऱ्यांनी या लसीकरण केंद्राला अचानकपणे भेट दिली. स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे व अन्य कार्यकर्तेदेखील तिथे उपस्थित होते. सदर लसीकरण केंद्र हे वार्ड क्रमांक २६च्या नगरसेविका प्रीतम पंडागळे यांच्या अखत्यारीत येते. त्यानुसार डॉ. कापसे यांनी याठिकाणचा संपूर्ण आढावा घेतला.

मोनोपॉली करणाऱ्यांना लसीकरण केंद्र हे पालिकेचे असून, सदर कर्मचाऱ्यांचा पगार हा पालिका देते. त्यामुळे कोणीही अन्य व्यक्तीने यावर आपला हक्क सांगणे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दात लसीकरणाच्या अनियमिततेबाबत आक्षेप नोंदविला. त्यानुसार याठिकाणी आता कडक नियम लावण्यात आले आहेत.

पालिकेचा स्टाफ तैनात

लसीकरण केंद्रात मोनोपॉली करणाऱ्यांना हटवून पालिकेचा स्टाफ आम्ही याठिकाणी तैनात केला आहे. तसेच याठिकाणी लावण्यात आलेले राजकीय बॅनर हटवून टोकन पद्धतीनेच लसीकरण केले जाईल, जेणेकरून स्थानिकांना याचा लाभ घेता येईल.

- संध्या नांदेडकर, सहाय्यक आयुक्त, आर. दक्षिण

फोटो मस्ट: वार्ड २६च्या संतमंत अनुयायी आश्रम लसीकरण केंद्रावर सरप्राईज व्हिजिट देणारे पालिका अधिकारी व स्थानिक आमदार.

Web Title: 'Token system' now in Santmant Anuvai Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.