झाडावर कार आदळल्याने एकजण जागीच ठार, एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:40 PM2021-07-26T23:40:06+5:302021-07-26T23:40:32+5:30
Accident : बोरोळ येथील शरद रामचंद्र पाटील (४४)व सतीश वैजनाथ कोयले (३५) हे दोघे सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कार (एम. एच. ४८ ए ५१९८) मध्ये बसून देवणीहून बोरोळला जात होते.
देवणी (जि. लातूर) : तालुक्यातील देवणी-बोरोळ मार्गावर भरधाव कार झाडावर आदळल्याने यात एक जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
बोरोळ येथील शरद रामचंद्र पाटील (४४)व सतीश वैजनाथ कोयले (३५) हे दोघे सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कार (एम. एच. ४८ ए ५१९८) मध्ये बसून देवणीहून बोरोळला जात होते. बोरोळ रोडवर बापूने यांच्या शेताजवळ सदर धावती कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात शरद रामचंद्र पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर सतीश वैजनाथ कोयले हे गंभीर जखमी झाल्याने देवणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी उदगीरला हलवण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच देवणी पोलीस ठाण्यातील पोहेकॉ. विनायक कांबळे, गणेश बुजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.