ऑक्सिजन निर्मिती कारखान्यास आ. पाटील यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:19+5:302021-04-18T04:32:19+5:30

उस्मानाबाद जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती कारखाना तामलवाडी येथे आहे. येथे दिवसाकाठी १ हजार सिलिंडर निर्मितीची क्षमता आहे. त्यातील ९०० सिलिंडर ...

Come to the oxygen production plant. Patil's visit | ऑक्सिजन निर्मिती कारखान्यास आ. पाटील यांची भेट

ऑक्सिजन निर्मिती कारखान्यास आ. पाटील यांची भेट

googlenewsNext

उस्मानाबाद जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती कारखाना तामलवाडी येथे आहे. येथे दिवसाकाठी १ हजार सिलिंडर निर्मितीची क्षमता आहे. त्यातील ९०० सिलिंडर जिल्हा रुग्णालयाला, दोनशे खासगी रुग्णांना दिली जातात, अशी माहिती कारखान्याचे व्यावस्थापक संतोष कुरे यांनी यावेळी दिली. सरकारी दवाखान्याबरोबर खासगी दवाखान्यानेदेखील ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा व्हावा. त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि संचिन पंडित, माजी नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, बाजार समितीचे संचालक यशवंत लोंढे, माजी सरपंच दत्तात्रय वडणेे, कारखाना व्यावस्थापक संतोष कुरे, बिट अंमलदार गोरोबा गाढवे, मंडळ अधिकारी बाळासाहेब जगताप, तलाठी आबा सुरवसे, आशू राजमाने आदी महसूलचे कर्मचारी उपस्थित होते.

पंधरा दिवसांत मागणी वाढली

जिल्ह्यात वाढणारी कोरोना बाधितांची संख्या पाहता १५ दिवसात तीनशेने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी वाढली आहे. क्षमता अन्‌ पुरवठा यामुळे कारखान्यावर ताण वाढला आहे. २४ तास कारखान्यात ऑक्सिजन निर्मितीचे काम चालू आहे. यासाठी कामगार वर्ग कारखाना व्यवस्थापन परिश्रम घेत आहेत.

Web Title: Come to the oxygen production plant. Patil's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.