"ब्रेक फेल" ट्रकने दिली धडक, सात वाहनांचा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:03 PM2020-09-24T12:03:55+5:302020-09-24T12:04:18+5:30

ट्रकची जोरदार  धडक समोरील कारला  बसली. त्यानंतर  तब्बल ७ कार एकानंतर एक धडकल्याचा  विचित्र अपघात बुधवार  दि. २३ रोजी सायंकाळी  ७ च्या सुमारास घडला

"Brake fail" truck hit, seven vehicles crash | "ब्रेक फेल" ट्रकने दिली धडक, सात वाहनांचा अपघात

"ब्रेक फेल" ट्रकने दिली धडक, सात वाहनांचा अपघात

googlenewsNext

औरंगाबाद : देवळाई चौकाकडून महानुभाव आश्रम चौकाकडे स्टील घेऊन जाणाऱ्या एका ट्रकची जोरदार  धडक समोरील कारला  बसली. त्यानंतर  तब्बल ७ कार एकानंतर एक धडकल्याचा विचित्र अपघात बुधवार दि. २३ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास घडला. ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे  हा अपघात घडला, असे ट्रक चालकाचे म्हणणे आहे. 

ट्रक चालक मुजीब दिलावर शेख ट्रक ( एमएच १७, के ५८८२) घेऊन जात असता एमआयटी कॉलेज वाहतूक सिग्नल येथे ट्रकचे बेक निकामी झाल्याचे  चालक मुजीब यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते ट्रक रस्त्याच्या डाव्या बाजूला घेणार होते. मात्र समोरच्या दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी  त्यांनी  ट्रक पुन्हा उजवीकडे घेतला. त्यामुळे तो समोरच्या चारचाकीला धडकला. यानंतर ती कार पुढच्या कारला, पुढची कार आणखी पुढच्या कारला  धडकली. अशा ५ कार एकानंतर एक धडकत गेल्या. तसेच ट्रकच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असणाऱ्या अन्य दोन कारही धडकल्या  व एका दुचाकीचेही  नुकसान झाले. यानंतर काही काळ सदरील मार्गावरवाहतूक कोंडी झाली होती.

 

Web Title: "Brake fail" truck hit, seven vehicles crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.