...तर गावागावात, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 07:00 PM2021-07-29T19:00:52+5:302021-07-29T19:16:33+5:30

बारामतीत ओबीसी आरक्षणासाठी एल्गार 

... Otherwise There will be no conflict on the streets in villages, : Former Minister Chandrashekhar Bavankule's warning | ...तर गावागावात, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

...तर गावागावात, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

Next

बारामती: राज्य सरकारने डिसेंबरपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाचा इम्पेरिकल डाटा न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक आहे.डिसेंबरपर्यंत डेटा तयार करा भाजप सरकारचं जाहिरपणे अभिनंदन करेल.मात्र,त्या कालावधीत डाटा तयार न केल्यास त्याचा अर्थ सरकारच्या मनात काहीतरी काळंबेरं आहे. ओबीसी आरक्षण न देता धनदांडग्यांना ओबीसींच्या जागांवर उभं करायचं असं सरकारचं षडयंत्र आहे, असं वाटते.मात्र, यानंतर गावागावात, रस्त्यांवर संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा माजी उर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे  ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीनं प्रशासकीय भवनासमोर एल्गार मोचार्चे  आयोजन करण्यात आलं होत . कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळे मोर्चा न होता फक्त सभा घेऊन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी उर्जा मंत्री   बावनकुळे उपस्थित होते. 

बावनकुळे पुढे म्हणाले, बारामतीतून ओबीसींचा एल्गार पुकारला गेला आहे. तो महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचेल.राजकारण न करता आम्ही  भाजप नेते सरकारच्या मदतीला तयार आहोत.सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे ओबीसींचा डेटा तयार करावा.वेळेत डाटा न्यायालयाकडे सादर करणे आवश्यक आहे, तरच येणाº्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षणाचा लाभ  मिळेल.मात्र , डाटा सादर न झाल्यास होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींचे फार मोठे नुकसान होणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर  म्हणाले,एकी नाही हेच राजकारण्यांचं भांडवल आहे.ओबीसींचा अभ्यास नसणारे लोक पंतप्रधानांना भेटायला गेले.जोपर्यंत नेता जन्मनार नाही ,तोपर्यंत तुम्ही घडणार नाही.याबद्दल आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे.देशात ६७ टक्के लोकसंख्या असलेल्या ओबीसींना आजही राजकीय सामाजिक आर्थिक प्रतिनिधीत्व मिळालं नाही. कारण प्रबोधन झालं नाही.ओबीसींना आजही न्याय मिळत नसल्याची खंत वाटते. जनावरांची जनगणना या देशात होते, मात्र माणसांची जनगणना होत नाही.ओबीसींचे आमदार खासदार बनवा,पक्ष तुम्ही ठरवा. रिमोट कंट्रोल हातात देऊ नका,असे जानकर म्हणाले.

यावेळी टी.जी मुंडे,जी.बी गावडे, अविनाश मोटे, ज्ञानेश्वर कौले,बापूराव सोलनकर,मच्छिंद्र टिंगरे यांचीही भाषणे झाली. यावेळी भाजपा आमदार योगेश टिळेकर,माजी आमदार प्रकाश शेंडगे,टि.जी मुंडे,भाजपा आमदार योगेश टिळेकर,अविनाश मोटे,अ‍ॅड जी.बी गावडे,  उपस्थित होते. 

Web Title: ... Otherwise There will be no conflict on the streets in villages, : Former Minister Chandrashekhar Bavankule's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.