कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्तीचा बोल्ड अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2017 11:55 AM2017-01-04T11:55:46+5:302017-01-04T11:55:46+5:30

कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमापासून सुमोना चक्रवर्ती कपिल शर्मासोबत काम करत आहे. या कार्यक्रमात तिने त्याच्या पत्नीची भूमिका ...

Kapil Sharma's on-screen wife Sumona Chakraborty's bold style | कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्तीचा बोल्ड अंदाज

कपिल शर्माची ऑनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्तीचा बोल्ड अंदाज

googlenewsNext
मेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमापासून सुमोना चक्रवर्ती कपिल शर्मासोबत काम करत आहे. या कार्यक्रमात तिने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या कार्यक्रमात तिच्या मोठ्या ओठांवरून कपिलने केलेले जोक्स प्रचंड गाजले होते. कपिलचा कलर्स वाहिनीसोबत वाद झाला आणि कपिलचा कॉमेडी नाइट विथ कपिल हा कार्यक्रम या वाहिनीवर दाखवण्याचे बंद करण्यात आले. हा कार्यक्रम बंद झाल्यानंतर कपिल आणि त्याच्या टीमची मजा-मस्ती सगळ्यांना कशी पाहायला मिळणार हा प्रश्न पडला होता. पण कपिलने त्याच्या या सगळ्या टीमला एकत्र घेऊन सोनी वाहिनीवर द कपिल शर्मा शो सुरू केला. या शोमध्येदेखील सुमोना त्याच्या पत्नीच्याच भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाली.
कपिल शर्माला त्याच्या संपूर्ण टीममुळेच लोकप्रियता मिळालेली आहे. सुमोना, सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, अली अजगर आणि नवज्योत सिंग सिद्धू अशी छान भट्टी यात जमून आली आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या प्रचंड लाडक्या बनल्या आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून सुमोना या कार्यक्रमातून गायब झाली आहे. त्यामुळे तिने हा कार्यक्रम सोडला का हा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे. पण ती मालिकेत परतणार असल्याची चर्चा सुरू आहे.
सुमोना सध्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत नसल्याने हॉलिडे एन्जॉय करत आहे. नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी ती नुकतीच श्रीलंकेला गेली होती. त्यावेळेचे काही फोटो तिने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिने शेअर केले आहेत. या फोटोत एक वेगळीच सुमोना पाहायला मिळत आहे. तिचा या फोटोंमधील बोल्ड अवतार हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 

sumona chakravarti bold pics

sumona chakravarti bold pics

sumona chakravarti bold pics

sumona chakravarti bold pics

sumona chakravarti bold pics

sumona chakravarti bold pics

sumona chakravarti bold pics

sumona chakravarti bold pics

sumona chakravarti bold pics


sumona chakravarti bold pics

sumona chakravarti bold pics


सुमोनाने कॉमेडी नाईट्स विथ कपिल, द कपिल शर्मा शो यांसारख्या कार्यक्रमात काम करण्यासोबतच काही बॉलिवुडच्या चित्रपटातही काम केले आहे. बडे अच्छे लगते है या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. मन या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत सुमोना दिसली होती. मन हा तिच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट होता. 

Web Title: Kapil Sharma's on-screen wife Sumona Chakraborty's bold style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.