४ प्रभाग समिती सभापती पदाच्या उमेदवारीसाठी ८; २ समित्यांच्या सभापती पदी भाजपचे उमेदवार बिनविरोध  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 07:17 PM2021-10-18T19:17:39+5:302021-10-18T19:20:01+5:30

प्रभाग समिती सभापतींची मुदत संपलेली असताना नवीन सभापतींची निवडणूक लांबली होती.

4 for the post of Ward Committee Chairperson; BJP candidate unopposed as chairman of 2 committees in mira-bhayender | ४ प्रभाग समिती सभापती पदाच्या उमेदवारीसाठी ८; २ समित्यांच्या सभापती पदी भाजपचे उमेदवार बिनविरोध  

४ प्रभाग समिती सभापती पदाच्या उमेदवारीसाठी ८; २ समित्यांच्या सभापती पदी भाजपचे उमेदवार बिनविरोध  

Next

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या ६ प्रभाग समिती सभापती पदांची निवडणूक बुधवार २० ऑक्टोबर रोजी होत असून त्यापैकी २ प्रभाग समिती सभापती पदी भाजपाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड होणार निश्चित आहे . तर उर्वरित ४ प्रभाग समिती सभापती पदासाठी ८ उमेदवारांनी अर्ज  असून तेथे देखील भाजपाचे बहुमत आहे . 

प्रभाग समिती सभापतींची मुदत संपलेली असताना नवीन सभापतींची निवडणूक लांबली होती . अखेर बुधवारी निवडणूक होणार असून आज सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले . भाईंदर पश्चिम प्रभाग समिती २ च्या सभापती पदासाठी भाजपाच्या पंकज पांडेय यांचा तर मीरारोड प्रभाग समिती ५ च्या सभापती पदासाठी भाजपाच्या अनिल विराणी यांचा एकमेव अर्ज आला आहे . त्यामुळे ह्या दोन्ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित आहे . 

भाईंदर पश्चिम प्रभाग समिती १ साठी भाजपाच्या नयना म्हात्रे व शिवसेनेच्या शर्मिला गंडोली ; भाईंदर पूर्व प्रभाग समिती ३ साठी भाजपच्या गणेश शेट्टी व शिवसेनेच्या वंदना पाटील ; कनकिया प्रभाग समिती ४ साठी भाजपच्या डॉ . प्रीती पाटील व शिवसेनेच्या स्नेहा पांडे तर मीरारोड - महामार्ग परिसर समिती ६ साठी भाजपच्या मोहन म्हात्रे तर काँग्रेसच्या अनिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांच्या कडे सादर केले. या उर्वरित चारही प्रभाग समित्यां मध्ये सत्ताधारी भाजपचे बहुमत असल्याने निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसच्या महाविकास आघाडीला यश मिळणे अवघड आहे . 

भाजपाचे उमेदवार ठरवताना माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यास व मेहता यांच्यात समन्वय साधत उमेदवारांची नावे निश्चित केल्याचे समजते . मेहता समर्थक गणेश शेट्टी यांना पुन्हा सभापती पदाची उमदेवारी देताना व्यास समर्थक विनोद म्हात्रे यांना आधी सभापती पद दिल्याने मेहता समर्थक नयना म्हात्रे यांची वर्णी लावण्यात आली . तर अनिल विराणी , मोहन म्हात्रे , प्रीती पाटील यांच्या नावांवर व्यास व मेहतांची सहमती झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

व्यास व मेहता यांचा समोर येऊन देखील अबोला 

मीरा भाईंदर भाजपा मध्ये जिल्हाध्यक्ष रवी व्यास व माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील मतभेद जाहीर असले तरी आज सोमवारी प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपा उमेदवारांचे अर्ज भरतेवेळी दोघेही समोरासमोर आले होते . परंतु मेहता व व्यास एकत्र दिसले असले तरी त्यांच्या अबोला कायम होता . 

Web Title: 4 for the post of Ward Committee Chairperson; BJP candidate unopposed as chairman of 2 committees in mira-bhayender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.