'KGF 2' हिट होताच यशचा वधारला भाव, मानधनाचा आकडा पोहचला इतक्या कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 03:13 PM2022-06-30T15:13:45+5:302022-06-30T15:18:36+5:30

KGF Fame Yash : साउथचा स्टार यश केजीएफ सीरिजमुळे जगभरात लोकप्रिय झाला आहे.

साउथचा स्टार यश केजीएफ सीरिजमुळे पॅन इंडिया स्टार बनला आहे. यशला केजीएफ रिलीज होण्यापूर्वी फार कमी लोक ओळखत होते. मात्र केजीएफ चित्रपटाने त्याला लोकप्रियतेच्या शिखरापर्यंत पोहचवले.

केजीएफच्या यशानंतर देशातील बऱ्याच निर्मात्यांना यशसोबत काम करायचं आहे.

. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, साउथच्या सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते दिल राजू लवकरच नवीन चित्रपटाची घोषणा यशसोबत करणार आहे. हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर रिलीज केला जाणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, दिल राजूने या चित्रपटासाठी यशला खूप मोठी ऑफर दिली आहे. यानंतर आता त्याचा भारतातील महागड्या कलाकारांच्या यादीत समावेश झाला आहे.

टॉलिवूड डॉट नेटच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, निर्माते दिल राजूने यशला आगामी चित्रपटासाठी साइन केले आहे. या चित्रपटासाठी ते त्याला १०० कोटी रुपये मानधन देणार आहेत.

यशला केजीएफ सीरिजच्या आधी कधीच इतकी मोठी रक्कम ऑफर झाली नव्हती. यश आणि दिल राजूच्या या चित्रपटाच्या कामाला लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे.

यशला १०० कोटींची ऑफर देणारा निर्माता दिल राजू सध्या पॅन इंडिया निर्माता बनण्याचा प्रयत्न करत आहे. तो दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माते आहेत, ज्याने जवळपास सर्व मोठ्या स्टार्स सोबत काम केले आहे.

आता तो बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमवण्यासाठी सज्ज झाला आहे. शाहिद कपूरचा जर्सी आणि राजकुमार रावचा हिट चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर दिल राजू आता मेगा बजेट चित्रपटाचा योजना आखत आहेत. हा चित्रपट सर्व भाषेत रिलीज केला जाणार आहे. यातील एक चित्रपट यशचा असणार आहे.