lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Richest Person Of Japan : कधीही कॉलेजात गेले नाहीत, पण 2800 अब्जांच्या संपत्तीचे बनले मालक!

Richest Person Of Japan : कधीही कॉलेजात गेले नाहीत, पण 2800 अब्जांच्या संपत्तीचे बनले मालक!

Richest Person Of Japan : ताकेमित्सु ताकीझाकी यांनी अब्जाधीश ताडाशी यानाई (Tadashi Yanai) यांना मागे टाकत हे स्थान मिळवले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 02:05 PM2021-09-15T14:05:42+5:302021-09-15T14:07:46+5:30

Richest Person Of Japan : ताकेमित्सु ताकीझाकी यांनी अब्जाधीश ताडाशी यानाई (Tadashi Yanai) यांना मागे टाकत हे स्थान मिळवले आहे. 

richest person of japan takemitsu takizaki who never went to college builds 38 billion dollars keyence corp | Richest Person Of Japan : कधीही कॉलेजात गेले नाहीत, पण 2800 अब्जांच्या संपत्तीचे बनले मालक!

Richest Person Of Japan : कधीही कॉलेजात गेले नाहीत, पण 2800 अब्जांच्या संपत्तीचे बनले मालक!

इलेक्ट्रॉनिक-सेन्सर बनवणाऱ्या कीन्स कॉर्पचे (Keyence Corp) संस्थापक ताकेमित्सु ताकीझाकी (Takemitsu Takizaki) जपानमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ताकेमित्सु ताकीझाकी यांनी अब्जाधीश ताडाशी यानाई (Tadashi Yanai) यांना मागे टाकत हे स्थान मिळवले आहे. 

ब्लूमबर्ग (Bloomberg)बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अब्जाधीश ताकेमित्सु ताकीझाकी यांची संपत्ती 38.2 अब्ज डॉलर्स (2800 अब्ज रुपयांहून अधिक) झाली आहे. कारण, त्याच्या कंपनीचे शेअर्स गेल्या वर्षीच्या सुरुवातीच्या तुलनेत सोमवारी जवळपास दुप्पट झाले होते. तर , ताडाशी यानाई यांची एकूण संपत्ती 35.5 अब्ज डॉलर इतकी राहिली.

ताकेमित्सु ताकीझाकी यांच्याबद्दल बोलयाचे झाल्यास ते कधीच कॉलेजला गेले नाहीत. 76 वर्षीय अब्जाधीश ताकेमित्सु ताकीझाकी यांच्याबाबत ब्लूमबर्गने सांगितले की, त्यांनी कधीही कॉलेजचे शिक्षण घेतले नाही. पण त्यांनी इलेक्ट्रॉनिक-सेन्सरचा शोध लावण्यास मदत केली. 


ताकेमित्सु ताकीझाकी यांनी 1974 मध्ये कीन्स कॉर्पची स्थापना केली आणि औद्योगिक ऑटोमेशनसाठी सेन्सर, मोजमाप साधने, मशीन-व्हिजन सिस्टीम आणि इतर उपकरणांची निर्मिती केली. 2015 मध्ये कीन्स कॉर्पचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ते आता कंपनीचे मानद अध्यक्ष आहेत.

दरम्यान, कीन्स कॉर्पचे शेअर्स 2020 च्या सुरुवातीपासून सोमवारच्या अखेरीपर्यंत 96% वाढले आहेत, ज्यामुळे कंपनीला सुमारे 167 अब्ज डॉलरचे बाजारमूल्य मिळाले आहे. या अर्थाने, ऑटो जायंट टोयोटा मोटर कॉर्पनंतर जपानमधील ही दुसरी मोठी कंपनी आहे.

Web Title: richest person of japan takemitsu takizaki who never went to college builds 38 billion dollars keyence corp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.