अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, पिकांचं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 04:42 PM2021-12-02T16:42:32+5:302021-12-02T16:43:29+5:30

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी भाताची सोंगणी करून, पेंढ्या बांधून ...

huge damage to crops due to heavy rain in nashik | अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, पिकांचं मोठं नुकसान

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, पिकांचं मोठं नुकसान

googlenewsNext

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी भाताची सोंगणी करून, पेंढ्या बांधून ठेवल्या आहेत तर काहीजणांनी भात सडकून खळ्यावरच डेपो मारुन ठेवला आहे. त्यामुळे भात भिजून त्याची प्रतवारी खालावण्याचा व पर्यायाने भाताला कमी भाव मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

तसेच पशुधनाचा चारा असलेले तणस सडन काळे पडणार आहे, त्यामुळे अशा चाऱ्याला पशुधनही तोंड लावणार नाही. अजून किती दिवस व किती पाऊस पडेल याचा अंदाज नसल्याने गहू, हरभरा, मसूर, वाटाणा अशा खरिपाची लागवड लांबणार आहे. भाजीपाल्यालाही या अवकाळीचा फटका बसणार असून भाजीपाला सडण्याचा व करपा पडण्याची शक्यता असल्याची भीती बेझे येथील शेतकरी बाळासाहेब आबाजी चव्हाण यांनी सांगितले.

बागायती शेतीची ही नुकसान झाले आहे. द्राक्षपिकाला सर्वाधिक फटका बसून या पावसाने द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक राजाराम चव्हाण, नवनाथ रामदास बोडके यांनी दिली. महसूल विभाग व कृषी विभाग यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

दिवसभर रिपरिप पाऊस, सर्वत्र धुक्याचे आच्छादन व वातावरणातील प्रचंड गारवा यामुळे गर्दीवरही परिणाम झाला असून एरव्ही आकाशात विहार करणारे असंख्य पक्षीसुद्धक दिवसभर आडोशाला बसून असल्याचे दिसत होते.

 

Web Title: huge damage to crops due to heavy rain in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.