बीबीदारफळ परिसरात धुवाधार...वडाळ्यात जेमतेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:24 AM2021-07-30T04:24:06+5:302021-07-30T04:24:06+5:30

सोलापूर : बीबीदारफळ परिसरात धुवाधार पडलेला पाऊस शेजारच्या वडाळा गावात जेमतेम पडला आहे. असे असले तरी उत्तर सोलापूर तालुक्यात ...

Dhuvadhar in Bibidarphal area ... Jemtem in Wadala | बीबीदारफळ परिसरात धुवाधार...वडाळ्यात जेमतेम

बीबीदारफळ परिसरात धुवाधार...वडाळ्यात जेमतेम

Next

सोलापूर : बीबीदारफळ परिसरात धुवाधार पडलेला पाऊस शेजारच्या वडाळा गावात जेमतेम पडला आहे. असे असले तरी उत्तर सोलापूर तालुक्यात सरासरी १५२.७ टक्के इतकाच पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

एक जूननंतर ६ जुलैपर्यंत जेमतेम पडला. त्यानंतर मात्र तालुक्याच्या काही गावात धुवाधार तर काही गावात जेमतेम पाऊस पडत आहे. बीबीदारफळ, अकोलेकाटी, कोंडी, रानमसले, कौठाळी या गावात सलग १५ दिवस पावसाने झोडपून काढले आहे. मात्र हाच पाऊस वडाळा, गावडीदारफळ या गावात जेमतेम पडत आहे. बीबीदारफळ गावात सलग अधिक प्रमाणावर पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र वडाळा परिसरातील सोयाबीन, मका, उडीद व इतर पिकांची वाढ जोमात सुरू आहे.

बीबीदारफळ व वडाळा या दोन्ही गावातील अंतर केवळ ११ किलोमीटर आहे. एवढ्या कमी अंतरात एका गावात नुकसानकारक तर दुसऱ्या गावात जेमतेम पाऊस पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

---

खुरपण..कोळपण अन् किचकिच..

जेमतेम पाऊस पडल्याने वडाळा गावात रविवारी सोयाबीन व इतर पिकांचे खुरपण व कोळपणी सुरू होती. इकडे बीबीदारफळ गावाच्या संपूर्ण शिवारात पाणीच पाणी झाल्याने किचकिच दिसत होती. बीबीदारफळ शिवारातील दोन्ही ओढ्यावरील बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

---

उत्तर सोलापूर तालुक्याचा २४ जुलैपर्यंतचा सरासरी पाऊस २१६ मि.मी. इतका असताना ३३० मि.मी. म्हणजे १५२.७ टक्के पडला आहे. वडाळा मंडलात २९४ मि. मी.,मार्डी मंडलात ३१९ मि. मी. तर तिर्हे मंडलात ३०७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. बीबीदारफळ गावात सर्वाधिक ३७३ मि.मी. पाऊस पडला आहे.

----

२९ उत्तर

मागील आठवडाभरात झालेल्या पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील जलस्रोत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. बीबीदारफळ परिसरात विहिरीबाहेर पाणी वाहत आहे.

Web Title: Dhuvadhar in Bibidarphal area ... Jemtem in Wadala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.