मानसी नाईकचा ब्लॅक स्वॅन लूक पाहिलात का? पहा तिचा फोटो व व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 05:03 PM2019-06-29T17:03:45+5:302019-06-29T17:04:21+5:30

मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे. कायमच आपल्या फॅशन स्टेटमेंटने ती रसिकांवर जादू करत असते

Mansi Naik Black Swan look on social media, see her photo and video | मानसी नाईकचा ब्लॅक स्वॅन लूक पाहिलात का? पहा तिचा फोटो व व्हिडिओ

मानसी नाईकचा ब्लॅक स्वॅन लूक पाहिलात का? पहा तिचा फोटो व व्हिडिओ

googlenewsNext

मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे. कायमच आपल्या फॅशन स्टेटमेंटने ती रसिकांवर जादू करत असते. आता पुन्हा एकदा मानसीनं रसिकांवर जादू केली आहे. यावेळी तिनं आपल्या डान्सनं नाही तर आपल्या खास लूकनं रसिकांना आकर्षित केलं आहे. 

मानसी नाईक सोशल मीडियावर बरीच सक्रीय असून ती सोशल मीडियावर स्वतःचे फोटो शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवादही साधते. नुकतेच तिने सोशल मीडियावर ब्लॅक स्वॅन लूक शेअर केला आहे. हा लूक तिने गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हलसाठी केला आहे. 

या ड्रेसमध्ये तिच्या घायाळ करणाऱ्या मादक अदा पाहायला मिळत आहेत. काळ्या रंगाच्या आऊटफिटसोबत डोक्यावर तुरा असल्यामुळे तिने या लूकला ब्लॅक स्वॅन असं संबोधलं आहे.  

मानसीच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून ती आपल्या डान्सचे जलवे दाखवते. 


याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसी रसिकांची मनं जिंकली आहेत. 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

 मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले.

मानसीच्या प्रत्येक गाण्याने तर पार्टी असो या लग्न हे गाणे धुमाकूळ घालताना पाहायला मिळते.

Web Title: Mansi Naik Black Swan look on social media, see her photo and video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.