श्रीलंकेत बोट उलटून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, १७ जणांनी पोहून जीव वाचवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 10:32 AM2021-11-24T10:32:40+5:302021-11-24T10:33:37+5:30

नवा पूल बांधण्यास उशीर होत असल्यामुळे लोकांना बोटीतून प्रवास करावा लागतो आहे, असे स्थानिक रहिवाशांनी म्हटले.

Six students were killed when their boat capsized in eastern Sri Lanka, while 17 others swam to safety | श्रीलंकेत बोट उलटून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, १७ जणांनी पोहून जीव वाचवला

श्रीलंकेत बोट उलटून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू, १७ जणांनी पोहून जीव वाचवला

Next

कोलंबो : फेरी बोट उलटून किमान सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर इतर १७ जणांनी पोहून जीव वाचवला, असे नौदलाने म्हटले. पूर्व श्रीलंकेत मंगळवारी ही दुर्घटना किन्नीयाच्या कुरून्नाकेन्नी खेड्यात घडली. हे सगळे जण शाळेत हजर राहण्यासाठी निघाले होते. १७ जणांमध्ये तीन विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

दुर्घटना घडली तेव्हा बोटीत किमान २० जण होते. नवा पूल बांधण्यास उशीर होत असल्यामुळे लोकांना बोटीतून प्रवास करावा लागतो आहे, असे स्थानिक रहिवाशांनी म्हटले. या दुर्घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तेथील सरकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
 

Web Title: Six students were killed when their boat capsized in eastern Sri Lanka, while 17 others swam to safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.