वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव पडले कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:33 PM2019-05-21T23:33:59+5:302019-05-21T23:34:08+5:30

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

Kadadetha falls in the Pajar lake in the Jaluj Metropolitan area | वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव पडले कोरडेठाक

वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव पडले कोरडेठाक

googlenewsNext

वाळूज महानगर : दुष्काळी परिस्थितीमुळे भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. वाळूज महानगर परिसरातील पाझर तलाव कोरडेठाक पडल्याने परिसरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.


वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षतोड करण्यात आली आहे. त्यामुळे गत काही वर्षांपासून वाळूज महानगर परिसरात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील बहुतांशी जलाशयांत पुरेसा साठा झाला नाही. त्यातच या भागात स्थानिक ग्रामपंचायतकीडून पाणी आडवा, पाणी जिरवा, तसेच तलाव खोलीकरणाचे कोणतेच काम झाले नाही. प्रशासकीय यंत्रणेबरोबरच लोकप्रतिनिधीही यासाठी पुढाकार घेताना दिसत नाहीत. वाळूज महानगरातील वडगाव कोल्हाटी, साजापूर, तीसगाव, घाणेगाव, गोलवाडीसह पाझर तलाव या गावासह लगतच्या गावचे जलस्त्रोत आहेत. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे हे तलावही कोरडेठाक पडले आहेत.

तसेच टेंभापूर प्रकल्पही कोरडा पडला आहे. तलावात पाण्याचा थेंबही नसल्याने तलावाला वाळवंटाचे स्वरुप आले आहे. त्याचबरोबर बहुतांशी जलस्त्रोतही आटले आहेत. परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेवून महानगरातील बहुतांशी गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

दिवसभर टँकरची वाट बहुनही केवळ ५-६ हंडे पाणी मिळत असल्याने नागरिकांना सर्वस्वी विकतच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे.

Web Title: Kadadetha falls in the Pajar lake in the Jaluj Metropolitan area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.