Flood : Video - पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, मदतीसाठी धडपड सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 09:21 AM2021-09-28T09:21:16+5:302021-09-28T09:51:25+5:30

उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली.

Flood : 5 passenger ST bus swept away in flood waters in yavatmal umarkhed | Flood : Video - पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, मदतीसाठी धडपड सुरू

Flood : Video - पुराच्या पाण्यात वाहून गेली महामंडळाची बस, मदतीसाठी धडपड सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देआज मंगळवार 28 सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार आनंद देऊळगावककर व उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

नागपूर - हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सोमवारी सायंकाळपासून मराठवाडा आणि विदर्भाला पावसाने झोडपले आहे. येथील नद्या नाले, ओढे तुडुंब भरले असून शेकडो गावांची वाताहात झाल्याचं पाहायला मिळत आहे. गावागावात पाणी शिरले असून मदत व बचावकार्य सुरू आहे. बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली.   

उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे बस कळंडली आणि नाल्यात वाहून गेली. उमरखेड वरून पुसदकडे ही बस जात होती, या बसमधून चालक आणि वाहकासह एकूण 5प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

आज मंगळवार 28 सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार आनंद देऊळगावककर व उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेली ही बस नागपुर आगाराची असून त्याचा बस क्र. ५०१८ आहे. सध्या, स्थानिक आणि प्रशासनाच्या मदतीने मदत व बचावकार्य सुरू आहे. 

गुलाब चक्रीवादळचा परिणाम

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर गुलाब नावाच्या चक्रीवादळात झाले असून, या चक्रीवादळाचा फटका प्रामुख्याने ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांना बसत आहे. मात्र, या चक्रावादळाचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवला असून मराठावाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडलाय. 

Read in English

Web Title: Flood : 5 passenger ST bus swept away in flood waters in yavatmal umarkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.