CoronaVirus News : कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले?; NGT ने दिले माहिती देण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 11:40 AM2022-05-17T11:40:35+5:302022-05-17T11:52:18+5:30

CoronaVirus News : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत अनेक मृतदेह वाहून आलेले दिसले. यावरून सरकारवर देखील जोरदार टीका करण्यात आली आहे.

ngt asks up bihar governments to inform number of human corpses found in river | CoronaVirus News : कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले?; NGT ने दिले माहिती देण्याचे आदेश

CoronaVirus News : कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले?; NGT ने दिले माहिती देण्याचे आदेश

Next

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,569 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,260 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत अनेक मृतदेह वाहून आलेले दिसले. यावरून सरकारवर देखील जोरदार टीका करण्यात आली आहे. यानंतर आता कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले किंवा पुरले याबाबत माहिती द्या असा आदेश NGT ने दिला आहे. 

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा नदीत मृतदेह तरंगताना दिसल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. एनजीटीने या वर्षी 31 मार्चपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गंगेत तरंगणारे आणि नदीच्या काठावर पुरण्यात आलेल्या मानवी मृतदेहांच्या संख्येबाबत दोन्ही राज्य सरकारांकडून माहिती मागवली आहे.

न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. अफरोज अहमद यांच्या खंडपीठाने अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि अतिरिक्त मुख्य सचिव, यूपी आणि बिहारचे प्रधान सचिव (आरोग्य) यांना या विषयावर तथ्यात्मक पडताळणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर किती मानवी मृतदेह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा नदीत तरंगताना दिसले, अशी विचारणा खंडपीठाने केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सरकारने किती प्रकरणांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कार किंवा पुरण्यासाठी कुटुंबीयांना आर्थिक मदत केली? याचीही विचारणा करण्यात आली होती. 

गंगा नदीत मृतदेह वाहून जाणे किंवा नदीच्या काठावर मृतदेह पुरण्यासारख्या गोष्टी थांबवण्यासाठी जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी कोणती पावले उचलली गेली आहेत का? याबाबतही माहिती मागवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या बॉर्डरवरील बक्सरमध्ये 40 मृतदेह वाहून आले होते. त्यावेळी प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेश येथून वाहून आल्याचा दावा केला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: ngt asks up bihar governments to inform number of human corpses found in river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.