virat kohli bodyguard: 'कोट्यवधींचा जीव'! विराट-अनुष्काच्या बॉडीगार्ड्सचा पगार माहित्येय का?

virat kohli and anushka sharma: भारतीय संघाचा खेळाडू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या अंगरक्षकाचे मानधन कोटीच्या घरात आहे.

बॉलीवूड स्टार्स सुरक्षेसाठी मोठा खर्च करत असतात. पण जेव्हा क्रिकेट आणि बॉलिवूड स्टार्सचा एकत्र येतात तेव्हा सुरक्षेची खबरदारी अधिक घेतली जाते. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचे लाखो चाहते आहेत.

खरं तर अलीकडेच भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या बॉडीगार्ड्सच्या पगाराचा मुद्दा समोर आला आहे. बॉलीवूड स्टार अनुष्का शर्माने स्टार क्रिकेटर विराट कोहलीशी लग्न केले आहे.

विराट आणि अनुष्का यांचा वैयक्तिक अंगरक्षक प्रकाश सिंग उर्फ ​​सोनू आहे. अनुष्का शर्मा सोनू या तिच्या अंगरक्षकाला त्याच्या सेवेची मोठी किंमत देते.

Zoom.com ने दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश सिंह उर्फ ​​सोनूचे वार्षिक मानधन सुमारे 1.2 कोटी रुपये आहे. अर्थात सोनूचा पगार अनेक कंपन्यांच्या सीईओंच्या सीटीसीपेक्षा जास्त आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी सोनू त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. दरवर्षी अनुष्का सोनूचा वाढदिवस साजरा करते आणि झिरोच्या सेटवरही अभिनेत्रीने सोनूचा वाढदिवस साजरा केला होता.

केवळ अनुष्कालाच नाही तर सोनू अनेकवेळा विराट कोहलीला देखील सुरक्षा देत असतो. अनेकवेळा भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचा सुरक्षा रक्षक नसतो तेव्हा सोनू कोहलीला सुरक्षा पुरवतो.

रिपोर्ट्सनुसार, जेव्हा अभिनेत्री अनुष्का शर्मा आई होणार होती, तेव्हा सोनूने अभिनेत्रीचे चांगल्या पद्धतीने संरक्षण केले आणि कोविडचा काळ चालू असताना सोनू अनुष्कासोबत पीपीई किट घातलेला पाहायला मिळाला होता.

मोठ्या कालावधीपर्यंत एकमेकांना डेट केल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 2017 मध्ये लग्न केले. मागील वर्षी विराट आणि अनुष्काला मुलगी झाली असून तिचे नाव वामिका ठेवले आहे.

अलीकडेच वामिका एक वर्षाची झाली. वामिकाच्या पहिल्या जन्मदिवसानिमित्त विराट आणि अनुष्का दोघांनीही आपल्या मुलीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता.