चीन हल्ल्याच्या तर पाकिस्तान घुसखोरीच्या तयारीत, हे मोदी सरकारचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 09:38 PM2021-10-20T21:38:58+5:302021-10-20T21:43:17+5:30

काँग्रेस सरकारने पाकिस्तानमधून बांग्लादेशाला अलग करून स्वातंत्र्य दिले तर चिनला सुध्दा धडा शिकवला

This is a failure of the Modi government in preparing for an attack by China and an infiltration of Pakistan | चीन हल्ल्याच्या तर पाकिस्तान घुसखोरीच्या तयारीत, हे मोदी सरकारचे अपयश

चीन हल्ल्याच्या तर पाकिस्तान घुसखोरीच्या तयारीत, हे मोदी सरकारचे अपयश

Next

नांदेड : भारताच्या सीमेवर एकीकडून चीन हल्ल्याच्या तयारीत तर दुसरीकडे पाकिस्तानमधून दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे चित्र आहे, हे मोदी सरकारचे अपयश असल्याची टीका माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नरंगल येथील एका जाहीर सभेत बोलताना सांगितले केली.

देशात काँग्रेसचे राज्य असताना स्वर्गवासी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानमधून बांग्लादेशाला अलग करून स्वातंत्र्य दिले तर चिनला सुध्दा धडा शिकवल्या गेला होता,अशी आठवण केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नरंगल येथे सांगितले. मोदी सरकार ने  370 कलम काढून काय केले ? त्या ठिकाणी प्रगती झाली नसुन उत्तर प्रदेशात भाजप सरकार असुन त्या ठिकाणी दलीतांची हत्या होते. ते सरकार झोपीच सोंग घेत असल्याचा प्रकार चालू आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वंचीत बहुजन आघाडी हे दलीत अल्पसंख्याक यांची दिशाभूल करत आहे.काँग्रेस हे सर्व धर्मांना सोबत घेऊन चालणर पक्ष आहे काही लोक हे काँग्रेस ला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी यांच्या विचारांचा पक्षाला विजय करा असे आवाहन शिंदे यांनी केले. तसेच वंचीत  बहुजन आघाडी हा पक्ष भारतीय जनता पार्टी ला मदत करते असा आरोप ही शिंदे यांनी केला. 

याप्रसंगी पालकमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार एस गंगाराम, जिल्हा परिषद सदस्य मिसाळे गुरजी, बापुराव गजभारे,शिवाजीराव देशमुख बळेगावकर, गोविंदराव गौड, बाळासाहेब रावनगावकर, जिल्हा परिषद सदस्य दिलीप बास्टेवाड, पंचायत समिती सदस्य राजेश फुलांरे, माजी जिल्हा परिषद सदस्य डिगाबर साखरे, रामचंद मुसळे, जगदीश पाटील भोसीकर, तालुका अध्यक्ष उद्धव पवार, शहरध्यक्ष माधव कदम, माजी सभापती डॉ माणिक जाधव, जिल्हा सल्लागार उत्तमराव पाटील लोमटे बारडकर, माजी नगरसेवक निळकंठ पडोळे यांच्या सह अदि उपस्थितीत होते.

Web Title: This is a failure of the Modi government in preparing for an attack by China and an infiltration of Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.