घोडबंदर रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात भाजपाचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 06:14 PM2021-09-06T18:14:04+5:302021-09-06T18:14:28+5:30

Thane : घोडबंदर भागातील ओवळा येथे अपघात होऊन रविवारी एकाचा बळी गेला होता. त्यानंतर सोमवारी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

BJP's agitation against potholes on Ghodbunder roads | घोडबंदर रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात भाजपाचे आंदोलन

घोडबंदर रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात भाजपाचे आंदोलन

Next

ठाणे  : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला असतांना देखील महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात पडलेले खड्डे आजही बुजविलेले दिसत नाहीत. त्यामुळे घोडबंदर भागात शहर भाजपच्या वतीने खडय़ांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या खडय़ांमुळे घोडबंदर भागात वाहतुक कोंडी होत आहे, वारंवार पत्रव्यवहार करुनही खड्डे बुजविले जात नसल्यानेच हे आंदोलन करण्यात आल्याचे माहिती आंदोलनकत्र्यानी दिली.

घोडबंदर भागातील ओवळा येथे अपघात होऊन रविवारी एकाचा बळी गेला होता. त्यानंतर सोमवारी भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ठाणे  शहर भाजपचे अध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत घोडबंदर मंडलाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. घोडबंदरच्या मुख्य रस्त्यांसह सेवा रस्त्यांना खड्डेच खड्डे पडलेले आहेत. मानपाडा पासून ते थेट ओवळा र्पयत दोनही बाजूच्या सेवा रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

वारंवार खड्डे पडत असून केवळ त्यावर तात्पुरता मुलामा लावण्याचे काम प्रशासनाकडून सुरु आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांचा निषेध करीत असून त्यांनी आता याकडे लक्ष देणो गरजेचे आहे. केवळ पैसा कमविणो हाच प्रशासनाचा उद्देश असून त्यामुळेच हे खड्डे बुजविले जात नाहीत.
- संजय केळकर - आमदार, ठाणे , भाजप

या खडय़ामुळे एकाचा बळी गेला असून त्याचा निषेध करीत यात जे दोषी असतील त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे. त्यातही हा अपघात घडल्यानंतर आता खड्डे बुजविणो काम सुरु असून त्यातही केवळ बुसा वापरला जात आहे. त्यामुळे केवळ वसुली करण्याचे काम सुरु असल्यानेच नागरीकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष सुरु आहे.
- निरंजन डावखरे - शहर अध्यक्ष, ठाणे - भाजप

Web Title: BJP's agitation against potholes on Ghodbunder roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.