आलिया सोबत असूनही कुठे हरवले रणबीर कपूरच्या चेह-यावरचे हसू? लोकांना पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 04:02 PM2020-02-05T16:02:08+5:302020-02-05T17:07:00+5:30

इतना दुखी क्यों है भाई ? वडिलांची चिंता की आणखी काही

ranbir kapoor gets trolled for his poker face with alia bhatt and mother neetu at armaan jain wedding reception | आलिया सोबत असूनही कुठे हरवले रणबीर कपूरच्या चेह-यावरचे हसू? लोकांना पडला प्रश्न

आलिया सोबत असूनही कुठे हरवले रणबीर कपूरच्या चेह-यावरचे हसू? लोकांना पडला प्रश्न

googlenewsNext
ठळक मुद्देरणबीर व आलिया दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. लवकरच दोघेही लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

मंगळवारी अरमान जैनच्या लग्नाची शाही रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनला बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली. रणबीर कपूरही आई नीतू सिंग व गर्लफ्रेन्ड आलिया भटसोबत आत्येभावाच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचला. पण हे काय? रणबीरपेक्षा त्याच्या पडलेल्या चेह-याचीच अधिक चर्चा झाली.  
ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने नीतू व रणबीर अरमानच्या लग्नाला हजर राहू शकले नव्हते. पण मंगळवारी अरमानच्या रिसेप्शनला रणबीर आईसोबत पोहोचला. त्याच्यासोबत आलिया भटनेही ग्रॅण्ड एन्ट्री घेतली.

तिघांची एन्ट्री पाहून मीडियाचे कॅमेरे पुढे सरसावले. आलिया व नीतू दोघीही अगदी हसत हसत मीडियाला पोज देताना दिसल्या. पण रणबीरच्या चेह-यावरची एक रेषाही हलली नाही. प्रत्येक फोटोत नीतू व आलियाच्या चेहºयावर मनमोहक हसू आहे. याऊलट रणबीरच्या चेह-यावर जराही हास्य नाही.
 कदाचित पापाच्या प्रकृतीमुळे रणबीर चिंतीत असावा. पण सोशल मीडियावर मात्र याचा वेगळाच अर्थ काढला गेला. अनेक युजर्सनी याचा संबंध आलिया व रणबीरच्या नात्याशी जोडला. 

आलिया व रणबीर एकत्र असताना आनंदी का दिसत नाहीत? असा सवाल हे फोटो पाहून एका युजरने केला. अन्य एका युजरने तर याही पुढचा विचार केला. ‘रणबीरच्या चेह-यावरून स्पष्ट दिसतेय की तो आलियाला कंटाळला आहे. गमतीत गमतीत गळ्यात पडली, असा विचार तो कदाचित करतेय,’ असे या युजरने लिहिले. 


‘रणबीरला दीपिका वा कॅटरिनासोबत कधीही इतके लाईफलेस बघितले नाही. पण आलियासोबत बघा, कसा ठोकळा वाटतोय,’ अशा शब्दांत एका युजरने या फोटोवर प्रतिक्रिया दिली.
रणबीर व आलिया दीर्घकाळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. लवकरच दोघेही लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

Web Title: ranbir kapoor gets trolled for his poker face with alia bhatt and mother neetu at armaan jain wedding reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.