लहरी निसर्गाचा फळबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:05 AM2021-05-08T04:05:56+5:302021-05-08T04:05:56+5:30

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दोन दिवस पडलेला पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका मोसंबी, डाळिंब बागांना फळधारणेच्या दरम्यानच बसला आहे. ढगाळ ...

The whimsical nature hit the orchards | लहरी निसर्गाचा फळबागांना फटका

लहरी निसर्गाचा फळबागांना फटका

googlenewsNext

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दोन दिवस पडलेला पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका मोसंबी, डाळिंब बागांना फळधारणेच्या दरम्यानच बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे मोसबी बागांची आंबा बहरात लगडलेली छोटी छोटी फळे मावामुळे गळून पडली आहेत, तर डाळिंब बागांवर महागड्या फवारण्या करूनही बागा आटोक्यात आलेल्या नाहीत.

आधीच मागीलवर्षीपासून कोरोना महामारीचे भूत मानगुटीवर बसले आहे. यात गेल्या वर्षभरापासून बागा पिकल्या, तर बाजारपेठा बंद राहिल्याने शेतकऱ्यांचा फळबागांवर झालेला खर्च निघाला नव्हता. शिवाय अतिवृष्टीने मागीलवर्षीची खरीप पिके वाया गेली. यंदा उन्हाळ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असूनही लहरी निसर्गाचा फटका बसल्यामुळे फळबाग शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

कोट

मी यंदा पाणी चांगले उपलब्ध असल्याने डाळिंब बागेचा बहर फोडला होता. ही बाग ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात विक्रीला निघाली असती, मात्र लहरी निसर्गामुळे यंदाचा हंगामही वाया गेला आहे.

- राजेंद्र पवार, डाळिंब उत्पादक शेतकरी, लाडसावंगी

कोट

मोसंबीला वर्षातून दोनवेळा बहर येतो. आंबा बहर फुलला, बागेला फळे लागण्यास सुरुवात झाली. मात्र महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे फळे गळून पडली आहेत. पाणी असून बाग केवळ लहरी निसर्गामुळे फेल गेली.

- बंडू पडूळ, मोसंबी उत्पादक शेतकरी.

कोट

दुसऱ्या हंगामात लॉकडाऊनमुळे होणारी गोची, तसेच लहरी निसर्गामुळे डाळिंब बागांचा खर्चही निघण्याची शक्यता नसल्याने मी डाळिंब बागेतील चारशे झाडे उपटून फेकून दिली.

- रवी पडूळ, लाडसावंगी

070521\img_20210503_104031.jpg

लहरी निसर्गामुळे डाळिंब बागेची झालेली दुरवस्था.

Web Title: The whimsical nature hit the orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.