Mumbai: डिलिव्हरी बॉयचा शिवसैनिकांवर मारहाणीचा आरोप; पोलिसांकडून चार कार्यकर्त्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 07:53 AM2021-07-30T07:53:39+5:302021-07-30T07:58:19+5:30

Amazon च्या डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर केला मारहाणीचा आरोप. समता नगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल.

mumbai amazon delivery boy alleges assault on shiv sainiks hours later police registered fir four arrested | Mumbai: डिलिव्हरी बॉयचा शिवसैनिकांवर मारहाणीचा आरोप; पोलिसांकडून चार कार्यकर्त्यांना अटक

Mumbai: डिलिव्हरी बॉयचा शिवसैनिकांवर मारहाणीचा आरोप; पोलिसांकडून चार कार्यकर्त्यांना अटक

Next
ठळक मुद्देAmazon च्या डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर केला मारहाणीचा आरोप.समता नगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल.

मुंबईत एका डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर गंभीर आरोप केले आहेत. डिलिव्हरी बॉयनं शिवसैनिकांवर मारहाणीचा आरोप केला आहे. दरम्यान, पीडित व्यक्तीच्या बहिणीचा आरोप आहे की पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याऐवजी तक्रारीच्या काही तासांनंतर FIR दाखल केला. दरम्यान, या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तसंच या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून दोन जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

मुंबईतील समता नगर पोलीस क्षेत्रात ही घटना समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात अॅमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयसोबत काही शिवसैनिकांनी मारहाण केली. मारहाणीत राहुल शर्मा नावाच्या डिलिव्हरी बॉयच्या डोक्यात सहा टाके लागले आहेत. यानंतर या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर शिवसेनेच्या शाखा प्रमुखांसह चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. दोन आरोपी सध्या फरार आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती समता नगर पोलिसांकडून देण्यात आली. 


दरम्यान, राहुल शर्मा याच्या बहिणीनं आरोप केला की ५ तास वाट पाहिल्यानंतर समता नगर पोलिसांनी त्यांची तक्रार ऐवली आणि आरोपीविरोधात एफआयआर दाखल केला. कादिवली पूर्व परिसरात राहणारा राहुल शर्मा हा मंगळवारी दुपारी अॅमेझॉनची ऑर्डर घेऊन जात होता. रस्त्यात पाऊस लागल्यानं तो पोयसर येथील शिवसेना शाखेबाहेर असलेल्या छताखाली उभा राहिला. तेव्हा एका व्यक्तीनं त्याच्या सामानावर पाय ठेवला. परंतु जेव्हा त्यानं त्या व्यक्तीला विचारणा केली तेव्हा काही शिवसैनिकांनी आपल्यासह मारहाण केली असं राहुल शर्मानं सांगितलं. 

Web Title: mumbai amazon delivery boy alleges assault on shiv sainiks hours later police registered fir four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.