ऋषी कपूर यांनी केले ‘शस्त्रपूजन’, फोटो पाहून संतापले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:43 PM2019-10-10T12:43:19+5:302019-10-10T12:44:34+5:30

ऋषी कपूर यांनी शस्त्रपूजनाचा फोटो शेअर केला. पण हे काय? ऋषी कपूर यांनी शेअर केलेला फोटो पाहून नेटक-यांचा संताप अनावर झाला

rishi kapoor troll for share photo of a bottle opener in dussehra | ऋषी कपूर यांनी केले ‘शस्त्रपूजन’, फोटो पाहून संतापले लोक

ऋषी कपूर यांनी केले ‘शस्त्रपूजन’, फोटो पाहून संतापले लोक

googlenewsNext
ठळक मुद्देनुकतेच ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरचा उपचार करून भारतात परतले.

दस-याच्या शस्त्रपूजनाचा भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. बॉलिवूडही याला अपवाद नाही. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनीही आपल्या घरी शस्त्रपूजन केले. या शस्त्रपूजनाचा फोटोही त्यांनी शेअर केला. पण हे काय? ऋषी कपूर यांनी शेअर केलेला फोटो पाहून नेटक-यांचा संताप अनावर झाला आणि लोकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.
आता ऋषी कपूर यांच्या शस्त्रपूजनातील कुठली गोष्ट लोकांना खटकली, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल.



 

होय, ऋषी कपूर यांनी शस्त्रपूजेच्या नावाखाली बॉटल ओपनरची पूजा केली. बाटली उघडण्यासाठी वापरल्या जाणा-या ओपनरच्या पूजेचा फोटो त्यांनी शेअर केला. ‘हॅपी दसरा, सणांसुदीचे दिवस सुरु झालेत. शस्त्रांचा वापर जबाबदारीने करा,’ असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले. हा फोटो शेअर करताना लोकांनी ऋषी कपूर यांना चांगलेच ट्रोल केले.




‘बोतलें खुलने में पूरा आर. के. स्टुडिओ बिक गया,’ असे एका युजरने त्यांना सुनावले. तर अन्य एका युजरने ‘एक सेलिब्रिटी या नात्याने तुमच्याकडून अशा ट्वीटची अपेक्षा नाही,’ असे खडेबोल सुनावले.




ऋषी कपूर त्यांच्या वादग्रस्त ट्वीटसाठी ओळखले जातात. अशाच अनेक ट्वीटसाठी ते यापूर्वीही ट्रोल झाले आहेत. नुकतेच ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरचा उपचार करून भारतात परतले. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर उपचारासाठी ते न्यूयॉर्कला रवाना झाले होते. सुमारे 11 महिने उपचार घेतल्यानंतर गत महिन्यांत ते मायदेशी परतले होते. ऋषी कपूर भारतात परतल्यावर अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे स्वागत केले होते. मुलगा रणबीर कपूर आणि मुलगी रिद्धिमा कपूर यांनी ‘वेलकम होम डॅड’ असे लिहित त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. तर आलिया भटने त्यांच्यासाठी खास पार्टीचे आयोजन केले होते.

Web Title: rishi kapoor troll for share photo of a bottle opener in dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.