हरिश दुधाडेच्या घरी आला नवा मेंबर, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 08:00 AM2019-05-01T08:00:00+5:302019-05-01T08:00:00+5:30

छोट्या पडद्यावरील अभिनेता हरिश दुधाडेने मालिकेत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.

New member in family of Harish Dudhade | हरिश दुधाडेच्या घरी आला नवा मेंबर, जाणून घ्या याबद्दल

हरिश दुधाडेच्या घरी आला नवा मेंबर, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext


छोट्या पडद्यावरील अभिनेता हरिश दुधाडेने मालिकेत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. नुकतेच त्याच्या घरी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कोण आहे हा पाहुणा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना.... हा पाहुणा म्हणजे कोणी व्यक्ती नाही तर त्याने नवीन गाडी घेतली आहे. फोर्ड इकोस्पोर्ट कार हरिशने विकत घेतली आणि ही बातमी त्याने सोशल मीडियावर दिली आहे. 


हरिश दुधाडेच्या घरात नवीन सदस्य आला असल्यामुळे तो खूप खूश आहे. त्याचा हा नवा मेंबर म्हणजे फोर्ड इकोस्पोर्ट कार. त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून म्हटले की, हर हर महादेव...एक नवा मावळा लढण्यासाठी सज्ज. माझ्या कुटुंबात नवीन सदस्य दाखल झाला फोर्ड इकोस्पोर्ट. नवीन कार.

माझे मन तुझे झाले' या मालिकेतून हरिश दुधाडे घराघरात पोहचला. त्यानंतर सरस्वती मालिकेत रणजीतची भूमिका साकारून हरिश दुधाडेने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. सध्या तो नकळत सारे घडले या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

नकळत सारे घडले या मालिकेची मूळ संकल्पना आहे स्टार प्रवाह क्रिएटिव्ह टीमची आहे. तर अभिनेता स्वप्निल जोशीच्या जिसिम्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे. बदलत्या काळातल्या बदलत्या नातेसंबंधाची गोष्ट या मालिकेत उलगडणार आहे. हरीश दुधाडेसोबत नुपूर परुळेकर, अनुराधा राजाध्यक्ष, सुदेश म्हशीलकर, सुरेखा कुडची हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

मालिकांव्यतिरिक्त हरिश फर्जंद या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने या चित्रपटात गणोजीची व्यक्तिरेखा साकारली होती.

या चित्रपटाला व त्याच्या भूमिकेला रसिकांनी दाद दिली होती.

Web Title: New member in family of Harish Dudhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.