अक्षय कुमारच्या सिनेमांनाही ‘कोरोना’ने ग्रासले, एक नाही सात सिनेमे रखडले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:24 PM2020-05-19T17:24:59+5:302020-05-19T17:35:31+5:30

अक्षय कुमारच्या या सात सिनेमांना लागली कोरोनाची दृष्ट!!

कोरोना व्हायरसमुळे सिनेसृष्टीही ठप्प आहे. निर्मात्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. एकट्या अक्षय कुमारचेच म्हणाल तर त्याचे सात सिनेमे कोरोना व लॉकडाऊनमुळे रखडले आहेत.

सूर्यवंशी- रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. कोरोना नसता तर गेल्या मार्चमध्येच हा सिनेमा रिलीज झाला असता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

बच्चन पांडे - हाऊसफुल 4 नंतर या चित्रपटात पुन्हा एकदा अक्षय कुमार व क्रिती सॅनॉनची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण लॉकडाऊनमुळे हा चित्रपटही रखडला

बेल बॉटम -हा सिनेमा या वर्षी अखेरीस रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनचा फटका या सिनेमालाही बसला. आता हा सिनेमा कधी रिलीज होईल, याची प्रतीक्षा आहे.

पृथ्वीराज - यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली साकारणा-या या सिनेमाचे शूटींग लवरकच सुरु होणार होते. मानुषी छिल्लर या चित्रपटातून डेब्यू करणार होती. पण लॉकडाऊनमुळे या पीरियड ड्रामाचे शूटींग थांबवण्यात आले.

लक्ष्मी बॉम्ब - लक्ष्मी बॉम्ब हा सिनेमा तर रिलीजसाठी तयार होता. पण लॉकडाऊनमुळे तो अडकला. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होईल, अशी चर्चा आहे. अर्थात अद्याप मेकर्सनी तशी घोषणा केलेली नाही.

अतरंगी रे - काही दिवसांपूर्वी आनंद एल राय यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. गत मार्च महिन्यातच सुरु होणार होते. पण लॉकडाऊनमुळे ते सुरुच होऊ शकले नाही.

एकता कपूरसोबतचा सिनेमा - अक्षयने या सिनेमांशिवाय एकता कपूरचा एक सिनेमाही साईन केला आहे. या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही़ पण आता लॉकडाऊनमुळे हा सिनेमाही लांबणीवर पडला आहे.