मी आत्महत्या करणार नाही, मला फक्त गांजा लागवडीची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 03:01 PM2021-11-19T15:01:53+5:302021-11-19T15:03:54+5:30

farmer suicide: तरुण शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे एक विनंती अर्ज दाखल केला असून त्यात मला गांजा लागवडीची परवानगी द्यावी, मी आत्महत्या किंवा सावकारी कर्ज घेणार नाही असे म्हटले आहे. 

I will not commit suicide, just allow me to grow marijuana; young farmer demand | मी आत्महत्या करणार नाही, मला फक्त गांजा लागवडीची परवानगी द्या

मी आत्महत्या करणार नाही, मला फक्त गांजा लागवडीची परवानगी द्या

googlenewsNext

लोहारा (जि.उस्मानाबाद) :  शेत परवडत नसल्याने अनेक शेतकरी हतबल होऊन आत्महत्या करत आहेत किंवा पुन्हा सावकाराचे कर्ज डोक्यावर घेत आहेत. मात्र, मी दोन्ही करणार नाही, मला फक्त शेतात गांजा लागवडीची परवानगी द्या, ( just allow me to grow marijuana; young farmer demand) अशी मागणी लोहारा तालुक्यातील मार्डी येथील तरुण शेतकरी महेश वसंतराव कदम याने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे शेतकरी महेश कदम याने एक अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार, ''मी मार्डी येथे बिगर पाण्याची शेती करणारा शेतकरी आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी मला शेतात पाण्याची आवश्यकता आहे. म्हणून, मी पोकरा योजनेतंर्गत अर्ज दाखल केला. पण ते म्हणाले की,आधी स्वत: जवळचे पैसे भरा नंतर अनुदान मिळवा. म्हणून मी त्यावेळी जास्त दर असेलेले सोयाबीन लावले. सोयाबीन खुप पिकलं पण पिक निघताच दर घसरले. १२ हजार रुपये क्विंटल असलेले सोयाबीन ५ ते ६ हजार रुपये क्विंटलवर आले. त्यामुळे भांडवल ही शिल्लक राहीले नाही. अशा परिस्थितीमुळेच शेतकरी आत्महत्या करतो किंवा सावकारी कर्ज काढून पुन्हा शेती करतो. 

पण, मी तसे करणार नाही. कारण, मी तरुण शेतकरी आहे. माझ्या तीन मागण्या आहेत, पहिली मागणी, माझ्या वडीलांनी एका खाजगी संस्थेत ३० वर्षे बिनपगारी शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. पण शासनाने न्याय दिला नाही. त्यांना न्याय मिळावा. दुसरी मागणी, सोयाबीनला प्रति क्विंटल १० हजार रुपये भाव द्या. तिसरी मागणी, मला शेतात गांजा लागवडीची परवानगी द्या, कारण असे केल्याशिवाय शेती करणे परवडणार नाही. मला न्याय द्या नाही तर न्याय व्यवस्थेवरील विश्वास उडून जाईल. शेतकरी आत्महत्या करेल नाही तर गांजा लागवड करेल.'', असे शेतकरी महेश कदम याने अर्जात मांडले आहे.

लहरी निसर्गामुळे शेती नुकसानीत आहे. यामुळे अनेक हतबल शेतकरी आत्महत्या करतात. तर दुसरीकडे काही ग्राम गांजाची किंमत मोठी आहे. यामुळे सातत्याने नुकसान सोसत असलेला शेतकरी आता शासनाकडे गांजा लागवडीची परवानगी मागत आहेत. यामुळेच तरुण शेतकरी महेश याने जिल्हाधिकारी यांना केलेली ही मागणी आता जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. 

Web Title: I will not commit suicide, just allow me to grow marijuana; young farmer demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.