शुभारंभ ! औरंगाबादेत कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात; १० केंद्रांवर दिली जाणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:03 PM2021-01-16T12:03:31+5:302021-01-16T12:15:09+5:30

Corona vaccination औरंगाबाद जिल्ह्यात कोवीड लसीकरण मोहीमेस पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.

Launch! Corona vaccination campaign begins in Aurangabad | शुभारंभ ! औरंगाबादेत कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात; १० केंद्रांवर दिली जाणार लस

शुभारंभ ! औरंगाबादेत कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात; १० केंद्रांवर दिली जाणार लस

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यात १० केंद्रांवर लसीकरण होत आहे.पहिल्या दिवशी एक हजार १०० कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

औरंगाबाद : जगभरासाठी महामारी ठरलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी देशभरात आजपासून आजवरची सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १० केंद्रांवर लसीकरणास प्रारंभ झाला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात कोवीड लसीकरण मोहीमेस पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या वेळी खा.भागवत कराड,आ.अतुल सावे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय आदी उपस्थित होते. बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र वैद्य यांना लस देण्यात आली. त्यांनतर डॉ.प्रशांत जाधव, डॉ रश्मी बोरीकर, डॉ प्रदीप गुजराथी, डॉ रेणू बोराळकर यांना लस देण्यात आली.

घाटीत अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उदघाटन झाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, डॉ. जगन्नाथ दीक्षित आदींची उपस्थिती होती.देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात १० केंद्रांवर लसीकरण होत आहे. घाटीत २०० आणि अन्य ९ केंद्रांवर १०० याप्रमाणे १० केंद्रांवर पहिल्या दिवशी एक हजार १०० कोरोना योद्धा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. ग्रामीण भागात वैजापूर आणि सिल्लोडमधील उपजिल्हा रुग्णालय आणि पाचोड व अजिंठा ग्रामीण रुग्णालय अशा ४ ठिकाणी पहिल्या दिवशी लसीकरणाला प्रारंभ झाला. शहरात घाटी रुग्णालयासह एन ८ आरोग्य केंद्र, एन- ११ आरोग्य केंद्र, भीमनगर आरोग्य केंद्र, सादात नगर आरोग्य केंद्र, बन्सीलालनगर आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण होत आहे.

Web Title: Launch! Corona vaccination campaign begins in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.