'ज्ञानवापी मशीद होती आणि  कयामतपर्यंत राहील'; सर्व्हेनंतर VIDEO शेअर करत ओवेसी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 04:09 PM2022-05-16T16:09:32+5:302022-05-16T16:10:51+5:30

"ज्ञानवापी मशीद होती आणि कयामतपर्यंत राहील इंशा अल्लाह," असे ट्विट ओवेसी यांनी केले आहे.

AIMIM chief Asaduddin Owaisi commented over Gyanvapi mosque and sharing VIDEO after the survey | 'ज्ञानवापी मशीद होती आणि  कयामतपर्यंत राहील'; सर्व्हेनंतर VIDEO शेअर करत ओवेसी म्हणाले...

'ज्ञानवापी मशीद होती आणि  कयामतपर्यंत राहील'; सर्व्हेनंतर VIDEO शेअर करत ओवेसी म्हणाले...

Next


काशीतील ज्ञानवापी सर्व्हेनंतर, देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. यासंदर्भात एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाष्य केले आहे. "ज्ञानवापी मशीद होती आणि कयामतपर्यंत राहील इंशा अल्लाह," असे ट्विट ओवेसी यांनी केले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी यासोबत एक व्हिडिओ शेअर करत, "आम्ही कुठल्याही प्रकारच्या हातचालाखीला घाबरणार नाही. ती मशीद होती आणि नेहमीसाठी असेन," असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

ओवेसी यांच्या या ट्विटनंतर, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही पलटवार केला आहे. ओवेसींसरख्या लोकांनी हैदराबादमध्ये बसून अर्थहीन वक्तव्ये करू नयेत. ज्ञानवापी प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करावा, असे म्हटले आहे.

तत्पूर्वी, ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळल्याच्या दाव्यानंतर न्यायालयाने संबंधित जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी शिवलिंग आढळून आले, ती जागा तातडीने सील करण्यात यावी आणि कुठल्याही व्यक्तीला तेथे जाऊ देऊ नये, असा आदेश वाराणसी न्यायालयाने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिला आहे. याशिवाय, याची जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि सीआरपीएफकडे देण्यात आली आहे. यासंदर्भात न्यायालयाने अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारीही निश्चित केली आहे. 

शिवलिंग सापडल्याचा हिंदू पक्षाचा दावा -  
ज्ञानवापी मशिदीत तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून टीम बाहेर येताच, हिंदू पक्षांनी विहिरीत शिवलिंग आढळून आल्याचा दावा केला. हिंदूंच्या म्हणण्यानुसार, मशिदीच्या आवारातील विहिरीत 12.8 फूट व्यासाचे शिवलिंग आढळून आले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार वजूवर बंदी -
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग आढळल्यानंतर न्यायालयाने, संबंधित परिसरात वजू करण्यावरही बंदी घातली आहे.
 

Web Title: AIMIM chief Asaduddin Owaisi commented over Gyanvapi mosque and sharing VIDEO after the survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.