५० कोटींचा पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिष दाखवित बांधकाम व्यावसायिकाला ५६ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 07:44 PM2022-06-26T19:44:02+5:302022-06-26T19:44:28+5:30

Crime News : पाच जणांवर गुन्हा;  दोघे ताब्यात?

Rs 56 lakh duped of builder by lured of rain of 50 crores rain | ५० कोटींचा पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिष दाखवित बांधकाम व्यावसायिकाला ५६ लाखांचा गंडा

५० कोटींचा पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिष दाखवित बांधकाम व्यावसायिकाला ५६ लाखांचा गंडा

Next

डोंबिवली:  ५० कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असे आमिष दाखवून एका बांधकाम व्यावसायिकाला तब्बल ५६ लाख रूपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघा जणांना ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहीती असून पोलिसांनी मात्र याबाबत मौन बाळगले आहे. लवकरच आरोपींना अटक करू असा दावा त्यांनी केला आहे.  


ठाकुर्ली पुर्वेतील चोळेगाव परिसरात राहणारे सुरेंद्र पांडुरंग पाटील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे कल्याण-शीळ मार्गालगतच्या दावडी गावातील पाटीदार भवन नजीक श्री एकविरा स्वप्ननगरी बिल्डींग नं ३ येथे कार्यालय आहे. शनिवारी गणेश, शर्मा गुरूजी, अशोक गायकवाड, महेश, रमेश मोकळे या पाच जणांनी सुरेंद्र यांना तुमच्या कार्यालयात ५० करोड रुपयांचा पाऊस पाडुन देतो असे आमिष दाखविले. मात्र त्यासाठी पूजा घालावी लागेल. परंतू पुजा मोठी असल्याने त्यासाठी तुम्हाला ५६ लाख रूपये खर्च करावे लागतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले. पाच जणांनी पैसे आणण्यास सुरेंद्र यांना सांगितले. पैसा पाडण्याच्या निमित्ताने कार्यालयात शनिवारी सकाळी आठ वाजता पुजेचा घाट देखील घालण्यात आला. पूजा झाल्यावर इमारतीला प्रदक्षिणा मारून येतो, असा बहाणा करून पाचही जणांनी ५६  लाखांच्या रक्कमेसह पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेंद्र पाटील यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्य यांना प्रतिबंध व निर्मूलन व काळी जादू नियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Rs 56 lakh duped of builder by lured of rain of 50 crores rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.