अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून; १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 07:18 AM2022-01-15T07:18:32+5:302022-01-15T07:18:38+5:30

संसदेचे हे सलग सहावे अधिवेशन कोरोना महामारीच्या छायेत होत आहे.

Budget session from January 31; Budget on February 1 | अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून; १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प

अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून; १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प

Next

- हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर केला जाईल. अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारी रोजी संपेल. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर १४ मार्च रोजी अधिवेशनाला पुन्हा सुरुवात होऊन ८ एप्रिल रोजी ते संपेल.

संसदेचे हे सलग सहावे अधिवेशन कोरोना महामारीच्या छायेत होत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज एकाचवेळी चालेल, की त्याच्या वेळा वेगळ्या असतील, की एक दिवस आड कामकाज चालेल, हे अजून स्पष्ट नाही. कोविड परिस्थितीचा आढावा राज्यसभेचे उपाध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी गेल्या आठवड्यात घेऊन अधिवेशन काळात विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी काय पावले उचलली जाऊ शकतात, याची चर्चा केली.

Web Title: Budget session from January 31; Budget on February 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.