Atak Tunnel: अभिमानास्पद! अटल टनलची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जगातील सर्वात लांब बोगदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 02:23 PM2022-02-16T14:23:18+5:302022-02-16T14:27:47+5:30

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी उत्कृष्ट इंजीनिअरिंग साठी या बोगद्याला दिले गेलेला पुरस्कार स्वीकारला.

Atal tunnel receive award of genis book world record for highest and longest tunnel | Atak Tunnel: अभिमानास्पद! अटल टनलची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जगातील सर्वात लांब बोगदा

Atak Tunnel: अभिमानास्पद! अटल टनलची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद, जगातील सर्वात लांब बोगदा

googlenewsNext

हिमाचल प्रदेशातील रोहतांग पास जवळ बांधला गेलेला अटल बोगदा जगात सर्वाधिक उंचीवर बांधला गेलेला सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरला असून त्याची नोंद युकेच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये घेतली गेली आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे महासंचालक लेफ्टनंट जनरल राजीव चौधरी यांनी उत्कृष्ट इंजीनिअरिंग साठी या बोगद्याला दिले गेलेला पुरस्कार स्वीकारला.

मनालीला लदाखशी जोडणाऱ्या आणि मनालीला लाहोल स्पिती खोऱ्याची जोडणाऱ्या या बोगद्याचे काम बीआरओने विक्रमी वेळात यशस्वी केले. अति उंचीवरील विरळ हवामान,कडाक्याची थंडी, ऑक्सिजनची कमतरता, प्रचंड उंचीचे पहाड, अतिशय दुर्गम भाग अश्या सर्व विपरीत परिस्थितीत या बोगद्याचे काम केले गेले. युकेच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेत मान्यताप्राप्त अशी जगातील असामान्य रेकॉर्डस प्रमाणीकरणासह नोंदविली जातात.

३ ऑक्टोबर २०२० रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल बोगदा राष्ट्राला अपर्ण करण्यात आला होता. रणनितिक दृष्टया अतिशय महत्वाचा असलेला हा बोगदा ९.०२ किमी लांबीचा आणि १० हजार फुटापेक्षा अधिक उंचावर बांधला गेलेला बोगदा आहे. पूर्वी हिवाळ्याच्या काळात लाहोल स्पिती,बर्फवर्षावामुळे बाकी देशापासून सहा महिने वेगळे पडत असे. पण या बोगद्यामुळे वर्षभर हा भाग देशाशी जोडलेला राहू शकतो. तसेच मनाली लेह प्रवास या बोगद्यामुळे ४६ किमीने कमी झाला आहे आणि प्रवासाचा ५ ते ६ तासाचा वेळ वाचला आहे. सर्व हवामानात या बोगद्यामुळे कनेक्टीव्हीटी ठेवणे शक्य झाले आहेच पण मुख्य म्हणजे या बोगद्यामुळे सशस्त्र दलांची वाहतूक विना अडथळा होऊ शकते आहे. शिवाय या भागातील नागरिकांना हा बोगदा वरदान ठरला आहे.

Web Title: Atal tunnel receive award of genis book world record for highest and longest tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.